आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यानं अखेर त्या फलंदाजाचं नाव उघड केलं, ज्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणं त्याला खूप अवघड जायचं. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यानं 700 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसन 10 जुलैपासून लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे. त्यापूर्वी ‘स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
मुलाखतीदरम्यान अँडरसनला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं नेहमीच आव्हानात्मक जायचं? तेव्हा इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजानं क्षणाचाही वेळ न घालवता सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याच्यासमोर गोलंदाजी करणं आव्हानात्मक होतं, असं अँडरसननं सांगितलं.
याशिवाय अँडरसननं त्याच्या सर्वोत्तम विकेटबद्दलही खुलासा केला. 2013 मधील ट्रेंट ब्रिज कसोटीत मायकेल क्लार्कला बाद करणं ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विकेट होती, असं या महान वेगवान गोलंदाजानं सांगितलं. अँडरसनच्या मते, मॅथ्यू पॉट्स आणि डिलन पेनिंग्टन हे गोलंदाज आगामी काळात इंग्लंडसाठी मोठे चमत्कार करू शकतात.
जिमी अँडरसननं आत्तापर्यंत 187 कसोटीत 800 बळी घेतले आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यात अँडरसनच्या नावे 269 विकेट्स असून टी20 इंटरनॅशनलमध्ये त्यानं 18 विकेट घेतल्या आहेत.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन – क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलेक अथानाझ, कावीम हॉज, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, जेडेन सील्स
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 क्रमवारीत ऋतुराज गायकवाडची मोठी झेप, शतकवीर अभिषेक शर्माचीही धमाकेदार एंट्री
श्रेयस अय्यर संघात नाही, तर गंभीर कोणाला बनवणार भारताचा टी20 कर्णधार? या खेळाडूचं नाव आघाडीवर
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी