ऍशेस मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जोरदार सराव करण्यात व्यस्त आहेत. २०१९ मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेत डेविड वॉर्नरला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेंडू छेडछाड प्रकरणातून बाहेर आल्यानंतर ही त्याची पहिलीच मालिका होती. आता आगामी कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजाने डेविड वॉर्नरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात डेविड वॉर्नर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत डेविड वॉर्नरने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून दिले होते. यासह त्याची ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली होती. आता इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने देखील मान्य केले आहे की, इंग्लंड संघ डेविड वॉर्नरला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
जेम्स अँडरसनने फॉल्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ऑस्ट्रेलिया संघासाठी त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की, हा तो खेळाडू नाहीये ज्याचा आम्ही २०१९ च्या उन्हाळी हंगामात सामना केला होता. आम्ही वॉर्नर विरुद्ध अनेक सामने खेळले आहेत.”
डेविड वॉर्नर हा ऑस्ट्रेलिया संघातील विस्फोटक फलंदाज आहे. परंतु, त्याला २०१९ मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने ९.५ च्या सरासरीने ९५ धावा केल्या होत्या. त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडने त्याला ७ वेळेस बाद केले होते.
पण, त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत ६३.२० च्या सरासरीने केल्या आहेत. यादरम्यान त्याने १८ शतके झळकावले आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी डेविड वॉर्नरला रिलीज केले आहे. त्यामुळे तो पुढील हंगामात दुसऱ्या संघातून खेळताना दिसून येऊ शकतो.
ऍशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाद की नाबाद? विराटच्या विकेटने उडवला गोंधळ, पाहा व्हिडिओ
शरद पवारांसह रूपाली चाकणकरांनी लुटला मुंबई कसोटीचा आनंद; फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल
मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…