ऍशेस मालिकेत (ashes series) ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर इंग्लंड संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (chris silverwood), फलंदाजी प्रशिक्षक ग्राहम थोर्पे आणि क्रिकेट संचालक एश्ले जाइल्स यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. अशात आता इंग्लंडच्या कसोटी संघात खूप मोठा बदल झाल्याचे समोर आले आहे. दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (james anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (stuart broad) यांनाही कसोटी संघातून बाहेर केले गेले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी या दोघांनी संघात निवडले गेले नाहीय.
अँडरसन आणि ब्रॉड यांना कसोटी संघातून बाहेर करण्याचा निर्णय इंग्लंड क्रिकेटचे अंतरिम अध्यक्ष ऍड्र्यू स्ट्रॉस यांनी घेतला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, निवड समितीचे प्रमुख जेम्स टेलर आणि अंतरिम प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला आहे. तसेच कर्णधार जो रुटशीही यासंदर्भात चर्चा केली गेली होती. या निर्णयावर त्याची काहीच हरकत नव्हती.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयानंतर जेम्स अँडरसनची कारकीर्द संपण्याची शक्यता आहे. अँडरसनचे वय सध्या ३९ वर्ष आहे आणि युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. माहितीनुसार, ऍशेस मालिकेत अँडरसनची सरासरीने संघातील इतर गोलंदाजांपेक्षा चांगली होती आणि ऍशेस २०२३ मध्येही त्याची खेळण्याची इच्छा होती. ब्रॉड आणि अँडरसन या दोघांना एकाच वेळी संघातून बाहेर केल्यामुळे माध्यामांमध्ये याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये ११०० विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, ऍशेस मालिकेचा विचार केला, तर अँडरसन आणि ब्रॉड यांचे प्रदर्शन संघातील फलंदाजांच्या तुलनेत अधिक चांगले होते. दोघांनी चांगली गोलंदाजी केली होती. अँडरसनने तीन सामन्यात ८, तर ब्रॉडने तीन सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या होत्या. मालिकेत इंग्लंडच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले, ते म्हणजे संघातील फलंदाज. स्वतः कर्णधार जो रूटने मालिकेत ३२.२० च्या सरासरीने धावा केल्या. डेविड मलान आणि बेन स्टोक्स यांची सरासरी २५ होती. तर जोस बटलरने चार कसोटी सामन्यात फक्त १५.२८ च्या सरासरीने १०७ धावा केल्या. मात्र, पराभवाचे खापर मात्र अँडरसन आणि ब्रॉडवर फुटताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
तो परत आला! तब्बल ९ वर्षांनंतर श्रीसंत उतरणार रणजीच्या रणांगणात
सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम
‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी आयसीसीने जाहीर केली नामांकने; ‘बेबी एबी’चाही समावेश