इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना सध्या केविंगटन ओव्हलवर खेळत आहे. शनिवारी (29 जुलै) ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. चाहत्यांसाठी ब्रॉडची निवृत्ती आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. जगभरातील चाहते आणि क्रिकेटचे जाणकार ब्रॉडला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही ब्रॉडच्या निवृत्तीबाबत आपली खास प्रतिक्रिया दिली.
शनिवारी म्हणजेच ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचने 377 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात त्यांची धावसंख्या 9 बाद 389 धावा होती. दिवसाखेर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. ओव्हल कसोटी त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असून रविवारी किंवा समोवारी त्याचा क्रिकेट प्रवास संपणार, असे त्याने स्पष्ट केले.
“तो अप्रतिम गोलंदाज आहे. जेम्स अँडरससोबत त्याची जोडी नेहमीच स्मरणात राहील. अँडरसन आणि ब्रॉडने संपूर्ण दशकात इंग्लंडसाठी क्रिकेट खेळले आणि दोघांनी खरोखर चांगली कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स आणि एवढे सामने खेळणं एखाद्या वरिष्ठ खेळाडूसाठीच शक्य आहे. माझ्याकडून ब्रॉडला शुभेच्छा आणि एवढ्या चांगल्या कारकिर्दीसाठी धन्यवाद. मला आशा आहे की कारकिर्दीचा शेवटच सर्वोत्तम प्रदर्शनाने करेल, जी त्याची स्वतःची इच्छा आहे.”
दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडने ऑगस्ट 2006 साली इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 17 वर्ष आपल्या संघाला सेवा पुरवल्यानंतर शनिवारी ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केली. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर ब्रॉड म्हणाला, “उद्या (रविवार) किंवा सोमवारी माझा शेवटचा क्रिकेट सामना संपेल. हा एक अद्भुत प्रवास होता. माझ्यासाठी नॉटिंघमशायर आणि इंग्लंड संघाचा बॅज घालणे भाग्याची गोष्ट आहे.” बॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 602 विकेट्स घेतल्या आहेत, जो आगडा ओव्हल कसोटीच्या शेवटच्या डावात वाढू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 178, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. (‘James Anderson-Stuart Broad pair will always be remembered’, says Rahul Dravid on English legend’s importance in team)
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव
‘हा’ संघ बनला Zim Afro T10चा पहिला-वहिला चॅम्पियन, 56 चेंडूत युसूफ पठाणच्या संघाचा खेळ खल्लास