सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket ground) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी (Aus vs Eng 4th test) सामना सुरू आहे. ऍशेस मालिकेतील (Ashes series) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव ऑस्ट्रेलिया संघाने ४१६ धावांवर घोषित केला आहे. दरम्यान, या डावात इंग्लंड संघाकडून १ गडी बाद करणाऱ्या जेम्स अँडरसनच्या (James Anderson) नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
जेम्स अँडरसन हा इंग्लंड संघातील दिग्गज खेळाडू आहे. गेल्या २० वर्षांपासून तो इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला एक गडी बाद करण्यात यश आले. हा त्याचा २०२२ वर्षातील पहिला बळी होता. यासह तो क्रिकेटच्या इतिहासात सलग २० वर्ष, प्रत्येक वर्षात कमीत कमी एक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. असा कारनामा करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने २००३ मध्ये पहिला गडी बाद केला होता. (James Anderson takes at least 1 test wicket every year for 20 consecutive years)
मुथय्या मुरलीधरनने केला होता पराक्रम
यापूर्वी श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने असा कारनामा केला होता. त्याने १९९२ पासून ते २०१० पर्यंत म्हणजे सलग १९ वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी एक वर्ष गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावे कसोटीत ८०० गडी बाद करण्याची नोंद आहे.
तसेच जेम्स अँडरसनबद्दल बोलायचं झालं, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने १६९ सामन्यातील ३१३ डावात २६ च्या सरासरीने ६४० गडी बाद केले आहेत. इतर कुठलाही गोलंदाज ६०० गडी देखील बाद करू शकला नाहीये. यादरम्यान त्याने ३ वेळेस १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच जेम्स अँडरसनच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याचा हा १६९ वा कसोटी सामना आहे.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५- लढवय्या साईराज बहुतुले!
मराठीत माहिती- क्रिकेटर साईराज बहुतुले
हे नक्की पाहा :