इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर न्यूझीलंडने १-० अशा फरकाने कब्जा केला. एजबॅस्टन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवशीच न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा पराभव केला. याच कसोटीसाठी मैदानात उतरताच इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम बनवणाऱ्या जेम्स अँडरसनच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.
आणखी एका बाबतीत कूकला टाकले मागे
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या जेम्स अँडरसन याच्यासाठी ही कसोटी यादगार ठरली. रोज बाऊल मैदानात उतरताच इंग्लंडसाठी सर्वाधिक १६२ कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. त्याने या याबाबतीत आपला माजी कर्णधार ऍलिस्टर कूक याला मागे टाकले होते. अँडरसन आणि कूक हे दोनच असे खेळाडू आहे ज्यांनी इंग्लंडसाठी १६० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मागे टाकण्यासोबतच अँडरसनने आणखी एका नकोशा यादीत कूकला पछाडले. इंग्लंडकडून कसोटीमध्ये खेळताना सर्वाधिक पराभव पाहणारा खेळाडू म्हणून अँडरसनची नोंद झाली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत खेळलेल्या १६२ कसोटीपैकी ५६ पराभव पाहिले आहेत.
इंग्लंडसाठी १६१ कसोटी खेळणाऱ्या ऍलिस्टर कूकला इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना ५५ पराभव पत्करावे लागले होते. इंग्लंडचा माजी फलंदाज ऍलेक स्टीवर्ट याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ५३ वेळा पराभूत होणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले. सध्या जेम्स अँडरसनसोबत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड याने देखील आपल्या १४७ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत ४७ पराभव पाहिले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा देखील कारकिर्दीत ४४ वेळा पराभूत संघाचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
डीकॉकच्या शतकानंतर रबाडाची धारदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावाने विजय
‘फॅब फोर’ पैकी केवळ ‘कर्णधार’ विराट कोहलीच ‘या’बाबतीत अजिंक्य
फ्रेंच ओपन: जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद; ‘हे’ विक्रमही केले नावावर