---Advertisement---

कसोटी मालिका जिंकण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरवणार आपली सर्वात खतरनाक जोडी

On: गुरूवार, जुलै 23, 2020 11:43 AM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरी साधली. साऊथॅम्प्टन येथे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवलेल्या अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत संघाला विजयाची संधी निर्माण केली. संघाचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला आपला जुना साथीदार ब्रॉड यांच्यासह तिसर्‍या आणि निर्णायक सामन्यात उतरणार आहे.

इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसनला वाटते की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक कसोटीत मालिका जिंकण्यासाठी आपल्याला आणि स्टुअर्ट ब्रॉडला एकत्र गोलंदाजीचे नेतृत्व करावे लागेल.

शुक्रवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघात अंतिम अकरा जणांच्या निवडीचा पेच कायम आहे. अँडरसनसह जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांचे संघात पुनरागमन होणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 113 धावांनी जिंकलेल्या सामन्यात ब्रॉड, सॅम कुरन आणि ख्रिस वॉक्स या सर्वांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अँडरसन म्हणाला, “मला वाटते की सर्वोत्तम तीन खेळाडू खेळतील, परंतु जो रूट (कर्णधार) आणि ख्रिस सिल्वरवुड (प्रशिक्षक) यांच्यासाठी हा एक कठीण निर्णय असणार आहे आणि यामुळे काही लोक निराश होतील.”

अँडरसन पुढील आठवड्यात 38 वर्षांचा होईल. इंग्लंडकडून खेळतांना विक्रमी 587 विकेट्स घेतलेला अँडरसन आणि 34 वर्षीय ब्रॉड एकत्र गोलंदाजी करणार नाहीत, अशी माहिती आहे. पण अँडरसन म्हणाला की, “अशी आशा आहे की असे काही होणार नाही. आमचे विक्रम बोलून दाखवतात आणि मला असे वाटते की जर आम्ही दोघे तंदुरुस्त आहोत आणि इंग्लंडने सर्वोत्तम गोलंदाज निवडले तर आम्ही दोघे त्यात सामील होऊ. ही एक चांगली परिस्थिती असेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---