---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीला मुकणार अँडरसन? १४ वर्षानंतर घडणार ‘अशी’ घटना

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 9:34 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू होईल. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर उभय संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तत्पूर्वी, या सामन्याआधी यजमान इंग्लंड संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणावर याचा मोठा परिणाम होईल.

हा गोलंदाज दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता
इंग्लंड संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या जांघेचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याआधी दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा देखील दुखापतग्रस्त असून, त्याचा कव्हर म्हणून साकीब मेहमूदला संघात निवडले गेले आहे.

पहिल्या सामन्यात अँडरसनने केलेली दमदार गोलंदाजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनने नॉटिंघम कसोटीत शानदार गोलंदाजी करत भारताच्या पहिल्या डावात चार बळी मिळवले होते. याच दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६२० बळींचा टप्पा पार करत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे स्थान पटकावले.

तर प्रथमच घडणार अशी घटना
अँडरसन आणि ब्रॉड हे दोघेही लॉर्ड्स कसोटीत न खेळल्यास २००७ नंतर असे प्रथमच होईल की, ब्रॉड व अँडरसन इंग्लंडमध्ये होत असलेल्या कसोटीत एकत्रितपणे सहभागी नसतील. यापूर्वी, २००७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हे दोघेही एकसाथ खेळले नव्हते.

लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), ओली रॉबिन्सन, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम करन, साकीब मेहमूद, जेम्स अँडरसन, झॅक क्राऊली, हसीब हमीद, मार्क वूड व जॅक लिच.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० क्रमवारीत मुस्तफिजुरची ऐतिहासिक मजल, तर शाकिब पुन्हा पोहोचला पहिल्या स्थानी

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री भारतीय संघाला करणार राम राम; संघात होऊ शकतात मोठे बदल

रविंद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी पाहून सेहवाग भलताच खुश; म्हणाला, ‘मला अजूनही आठवतय…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---