टी२० विश्वचषकात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. रविवारी (३१ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली. हा भारतासाठी विश्वचषकाती सलग दुसरा पराभव ठरला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आणि परिणामी संघाला सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारतीय संघासाठी या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (२३) आणि रवींद्र जडेजाने (२६) सर्वाधिक धावा केल्या. दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आणि हार्दिकने मारेलेल्या एका शॉटला आडवले.
हार्दिकने त्याच्या फलंदाजीदरम्यान एक मोठा शॉट खेळला होता, जो सीमारेषेबाहेर षटकार गेला असता. पण जेम्स नीशमने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आणि चेंडूला सीमारेषेबाहेर जाण्यापासून रोखले. हा शॉट खेळताना हार्दिकचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. अशात त्याने शार्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील चेंडू खूप हवेत उंच गेला आणि तो सीमारेषेबाहेर गेला असता, पण तेव्हाच जेम्स नीशम चेंडूला रोखण्यासाठी मध्ये आला. सीमारेषेजवळ आलेल्या नीशमने हवेत उडी मारली आणि एका हाताने चेंडूला सीमारेषेपार जाण्यापासून रोखले. नीशमने अगदी योग्य वेळी ही उडी मारून संघासाठी चार धावा वाचवल्या.
https://www.instagram.com/p/CVsorSyFJom/
हार्दिक पंड्याने मारलेला हा शॉट पाहून समालोचकही म्हणाला की, १० पैकी ९ वेळा हार्दिकने हा चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर लावला असता. पण आता खराब फॉर्ममुळे तो चेंडूला चांगल्या प्रकारे टाइम करू शकला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही.
यानंतर जेव्हा भारतीय संघाला डावाच्या अंतिम षटकांमध्ये जास्त धावा करण्याची आवश्यकता होती, त्यावेळी हार्दिक बाद झाला आणि संघ २० षटकांमध्ये अवघ्या ११० धावा करू शकला. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात भारताने दिलेले लक्ष्य १४.३ षटकांमध्ये गाठले आणि विश्वचषकातील त्यांचा पहिला विजय मिळवला. भारताच्या या पराभवानंतर संघ उपांत्य सामन्याच्या शर्यातीतून जवळपास बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘हिटमॅन’ जोरदार ट्रोल
लज्जास्पद! विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीला आल्या हीन दर्जाच्या धमक्या
पत्रकारानं केली हिंदीत उत्तर देण्याची विनंती, ईश सोढी म्हणे, ‘आईने पाहिलं तर…’