विश्वचषक २०१९चा उपांत्य फेरी सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झाला होता. सर्वांना आशा होती की, भारत उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम सामन्यात जाईल. मात्र, न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विश्वचषकातून बाहेर केले होते. परंतु, हा सामना चाहत्यांना अविस्मरणीय यासाठी ठरला कारण, त्या सामन्यापासून आजपर्यंत एमएस धोनीने क्रिकेट खेळलेले नाही.
चाहत्यांप्रमाणेच एक खेळाडूही तो सामना कधीच विसरु शकणार नाही. कारण, त्या सामन्यात त्या खेळाडूच्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय क्षण आला होता.
पण चकित करणारी गोष्ट ही आहे की, तो खेळाडू भारताला विश्वचषक २०१९च्या उपांत्य फेरीत पराभूत करणाऱ्या न्यूझीलंड संघातील आहे. त्याचे नाव जेम्स नीशम असे आहे. James Neesham Had unforgettable Moment In MS Dhoni’s Last Match
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू नीशमने आयपीएलमधील आपल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ट्विटर हॅंडलवर बोलताना म्हटले की, “माझ्यासाठी २०१९च्या विश्वचषकातील अविस्मरणीय क्षण म्हणजे भारताला हारवून आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रुममध्ये बसणे हा आहे. पावसामुळे तो उपांत्य फेरी सामना २ दिवस चालला होता. आम्ही प्रथम फलंदाजी करत ८ बाद २३९ धावा केल्या होत्या आणि भारताला २४० धावांचे आव्हान दिले होते. पण, आम्ही भारताला ४९.३ षटकात २२१ धावांवर सर्वबाद केले होते.”
Sitting in the changing room with the guys after the semifinal against India https://t.co/uP5lp5ygLp
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) June 2, 2020
“या सामन्यात भारताने ९२ धावांवरच ६ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रविंद्र जडेजाने ५९ चेंडूत ७७ धावा करत धोनीसोबत ११६ धावांची भागिदारी केली होती आणि सामना आपल्या बाजूने केला होता. पण ४९व्या षटकात मार्टिन गप्टिलने धोनीला बाद केले आणि सामन्याचे चित्रच बदलवून टाकले. भारताने तो सामना १८ धावांनी गमावला होता,” असे नीशम पुढे बोलताना म्हणाला.
नीशमने त्याच्या वनडे कारकिर्दीत ६३ सामन्यात १२८६ धावा केल्या आहेत. तर ६१ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
पाकिस्तान सुपर लीग लागली भिकेला, आता विक्रीत काढल्या…
लवकरच बाप होणाऱ्या हार्दिक पंड्याची ‘आयपीएलची बाप ड्रीम ११’, रोहितला…
मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल