---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मोठा खुलासा, भारतीय दौऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 10:35 AM
---Advertisement---

क्रिकेट विश्वातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जेमी मिशेलने (Jamie Mitchell) गंभीर आरोप करत म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले होते. या आरोपानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जेमी मिशेल याने आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, १९८५ मध्ये भारत आणि श्रीलंका १९ वर्षाखालील संघांमध्ये मालिका सुरू होती, त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी त्याचे लैंगिक शोषण केले होते. आता वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, एका वैद्याने त्यांचा उपचार करत असताना त्यांचे लैंगिक शोषण केले होते. हे आरोप केल्यानंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच या प्रक्रियेत क्रिकेट ऑस्ट्रेलिया देखील सहकार्य करत आहे.(Jamie Mitchell sexual abuse)

जेमी मिशेलने एक ऑनलाईन फोटो पाहिल्यानंतर गेल्या वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जाब विचारला होता. त्याने हे प्रकरण शासनाच्या भ्रष्टाचार आणि गैरवर्तन विभागाला देखील कळवले आहे. तसेच त्याने फेडरल पोलिसांशी देखील संपर्क साधला आहे. एबीसीने दिलेल्या माहितीनुसार, जेमी मिशेल म्हणाला की, “मला थोडासा दिलासा मिळाला आहे की १९८५ च्या त्या दौऱ्याची अखेर चौकशी केली जात आहे. तो दौरा माझ्या क्रिकेटच्या जीवनाचे मुख्य आकर्षण असण्याऐवजी, त्यामुळे मला अनेक वर्षांपासून तणाव आणि छळ सहन करावा लागला आहे.”

जेमी मिशेलने या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ६ प्रश्नांची यादी सोपवली आहे. ज्यामध्ये त्याला या दौऱ्याचा अहवाल आणि आढावा तसेच त्याच्या वैद्यकीय नोंदींचे काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. रिपोर्टनुसार, कोलंबोमध्ये ३० मार्चच्या रात्री मिशेलला अस्वस्थ वाटत होते आणि तो डॉक्टरकडे गेला, त्यावेळी डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिले. यानंतर मिशेल किमान १० तास बेशुद्ध पडला होता.

तसेच त्याने पुढे सांगितले की, त्याच्या साथीदारांना त्या रात्री त्याच्या खोलीत न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मिशेलचे असे म्हणणे आहे की त्या काळात संघाच्या एका प्रमुख अधिकाऱ्याने त्याच्याशी गैरवर्तन केले होते.

महत्वाच्या बातम्या:

जोहान्सबर्गमधील टीम इंडियाची ‘ती’ परंपरा ‘कॅप्टन’ राहुलमूळे अबाधित

साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा :

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---