---Advertisement---

जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी

---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने संपले असून शेवटचे आठ संघ निश्चित झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीचे चारही सामने सोमवारी (28 नोव्हेंबर) खेळले जाणार आहेत. वनडे प्रकारच्या या स्पर्धेत शनिवारी (26 नोव्हेंबर) दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यामध्ये एक संघ असा आहे, जो स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ही स्पर्धा 1993-94 पासून खेळली जात आहे.

एकीकडे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा चार वेळेचा चॅम्पियन मुंबई संघ स्पर्धेबाहेर झाला. त्यांना उत्तर प्रदेशने 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला आणि दुसरीकडे जम्मू-काश्मिरने केरळला पराभूत करत इतिहास रचला. यामुळे विजय हजारे ट्रॉफी 2022च्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने पंजाब विरुद्ध कर्नाटक, महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश, आसाम विरुद्ध जम्मू-काश्मिर, तमिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात खेळले जाणार आहे.

शनिवारी जम्मू-काश्मीर केरळशी भिडला. या सामन्यात जम्मू-काश्मिरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जम्मू काश्मीरच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी केरळला 47.4 षटकात 174 धावसंख्येवरच रोखले. या सामन्यात केरळकडून सर्वाधिक धावा मनोहरन याने केल्या. त्याने 81 चेंडूत 62 धावा केल्या. तसेच आकीब नबी याने 10 षटकात 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. युधवीर सिंग याने 7.4 षटकात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरचे सलामीवीर कामरान इक्बाल (Qamran Iqbal) आणि शुभम खजुरिया यांनी चांगली सुरूवात केली. दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. इक्बाल 51 धावा करत रिटायर्ड-हर्ट झाला, तर खजुरिया 76 धावा करत धावबाद झाला. त्यांनी 37.5 षटकात 3 विकेट्स गमावत लक्ष्य पार केले आणि इतिहास रचला. त्याचबरोबर ते रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी किंवा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धांममध्ये त्यांचा पहिला बाद फेरीचा विजय मिळवला.

नुकतेच भारताच्या वनडे संघात पदार्पण करणाऱ्या उमरान मलिक याच्या गोलंदाजीने जम्मू-काश्मीर चर्चेत आला असताना, आता तेथिल आणखी युवा खेळाडूंनी त्यांच्या कमागिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. Jammu & Kashmir Cricket Team First Time enter in Vijay Hazare Trophy quarter final

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरान मलिकसाठी टी-20 पेक्षा वनडे क्रिकेटच चांगले! भारतीय दिग्गजाकडून मिळाला सल्ला
वॉर्नरला मिळाला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा पाठिंबा! म्हणाला, ‘त्याने किंमत चुकवलीय आता…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---