मागच्या काही दिवसांपासून क्रीडाजगातत ऑस्ट्रेलिया ओपनच्या चर्चा सुरू आहेत. रविवारी (28 जानेवारी) वर्षातील या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना (पुरुष) खेळला गेला. इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. रुसचा डेनिल मेदवेदेव या सामन्यात त्याचा विरोधक होता. मेलबर्न पार्कवर झालेल्या या अंतिम सामन्यात सिनरने 3-6, 3-6, 6-4, 6-4, 6-3 असा विजय मिळवला.
इटलीच्या यानिक सिनर (Jannik Sinner ) याचे टेनिस कारकिर्दीतील हे पहिलेच ग्रँड स्लॅम आहे. त्याने रविवारी मेदवेदेवचे स्वप्न धुळीत मिळवले. रुसच्या डेनिल मेदवेदेव पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ओपन जेतेपद पटकावण्यासाठी रविवारी मैदानात उतरला होता. पण इटलीच्या युवा टेनिसपटूने त्याला पराभूत केले. मेदवेदेव याआदी 2021 मध्ये यूएस ओपनचे ग्रँड स्लँम जिंकला आहे.
Congratulations @DaniilMedwed on a remarkable #AO2024 💙
Always fierce on court. Entertaining post-match. Humble in victory. And gracious in defeat.
We’ll see you next year, Daniil 👋#AusOpen pic.twitter.com/49avZ38u4f
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2024
सामन्याचा विचार केला, तर पहिल्या दोन सेटमध्ये मेदवेदेवने 6-3, 6-3 अशा अंतराने बाजी मारली होती. पण तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये शिरने 6-4, 6-4 अशी बाजी मारली. शेवटच्या निर्णायक सेटमध्येही सिनरने आघाडी घेत 6-3 अशा अंतराने बाजी मारली आणि सामना नावावर केला.
दरम्यान, मागच्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ओपनला नवा खेळाडू चॅम्पियन म्हणून मिळाला आहे. याआधी 2014 मध्ये स्विट्जरलँडचा स्टॅन वावरिंका पुरुष एकेरीचा विजेता ठरला होता. स्विट्जरलँडचा रॉजर फेटरर, सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नडाल यांनी एकप्रकारे टेनिस गजतावर मागच्या दोन दशकांमध्ये राज्य केले आहे. 2005 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा या तिघांपैकी एकही खेळाडू ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम सामन्यात खेळला नाहीये.
The last time the AO men’s final didn’t include Djokovic, Nadal or Federer (2005)…
▪️ Marat Safin and Lleyton Hewitt were finalists
▪️ YouTube and Twitter didn’t exist
▪️ Novak Djokovic hadn’t won a Grand Slam yet
▪️ Our courts were green
▪️ Coco Gauff was less than a year old pic.twitter.com/NP3FbCfcNx— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2024
ऑस्ट्रेलिया ऑपनमध्ये जोकोविचने सर्वाधिक 10 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. फेडररेने 6, तर नडाल दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरला आहे. (Jannik Sinner won the Australian Open 2024 men’s singles title)
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND । ‘हा विजय सर्वात भारी…’, हैदराबाद कसोटी इंग्लिश कर्णधारासाठी ठरली खास, वाचा अजून काय म्हणाला
*कसोटी क्रिकेटचे सौंदर्य! वेस्ट इंडीजच्या विजयाने लारांच्या डोळ्यात पाणी, गिलक्रिस्टने मारली मिठी । VIDEO*