भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील ४ सामने पार पडले असून पाहुणा भारतीय संघ २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. या मालिकेदरम्यान जितकी खेळाडूंची आणि त्यांच्या कामगिरीची चर्चा झाली अगदी तितकीच किंवा त्याहून जास्त एका ब्रिटिश चाहत्याची चर्चा झाली. हा चाहता म्हणजे, ‘जार्वो’. सलग ३ कसोटी सामन्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत मैदानात घुसलेल्या जार्वोने आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे आभार मानले आहेत.
द केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान जार्वो गोलंदाजी करण्यासाठी मैदानात घुसला होता. यावेळी त्याने नॉन स्ट्राईकरवर उभा असलेल्या इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोला धक्का दिला होता. यामुळे त्याला अटकसुद्धा करण्यात आली होती. याच बेयरस्टोला भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने शून्यावर बाद केले होते.
Jarvo again!!! Wants to bowl this time 😂😂#jarvo69 #jarvo #ENGvIND #IndvsEng pic.twitter.com/wXcc5hOG9f
— raghav (@raghav_padia) September 3, 2021
भारताच्या ३६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने १४६ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर बेयरस्टो फलंदाजीसाठी मैदानात आला होता. पण याच बेयरस्टोला बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकत खातेही न उघडू देता तंबूत धाडले होते. याच कारणामुळे जार्वोने बुमराहचे आभार मानले आहे.
त्याने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर यासंबंधी पोस्ट केली आहे. त्याने बेयरस्टोचा बाद झाल्यानंतर पव्हेलियनला परतनाचा फोटो आपल्या पोस्टमध्ये जोडला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘मी जसप्रीत बुमराहचे आभार मानू इच्छितो आहे. कारण त्याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद केले आहे. हाच जॉनी बेयरस्टो त्या दिवशी माझ्यावर रागावला होता.’
ओव्हल कसोटीपूर्वी जार्वो लॉर्ड्स, तसेच हेडिंग्ले कसोटीतही मैदानात घुसला होता. लॉर्ड्स कसोटी दरम्यान तो क्षेत्ररक्षण करण्याच्या हेतूने, तर हेडिंग्ले कसोटी दरम्यान बॅट घेऊन मैदानात उतरला होता. त्याच्या या कृतीमुळे इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यॉर्कशायर क्रिकेटने केली होती कारवाई
हेडिंग्ले मैदान हे यॉर्कशायर काउंटी संघाचे घरचे मैदान आहे. तिसरा सामना संपल्यानंतर यॉर्कशायर क्रिकेटने मैदानात घुसलेल्या जार्वोवर कारवाई केल्याचे सांगितले होते. त्यांनी जार्वो याला आर्थिक दंड तसेच आयुष्यभर या मैदानावर न येण्याची कारवाई केली. सुरक्षा नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचे यॉर्कशायर क्रिकेटकडून सांगितले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जार्वोसारख्या मैदानात घुसणाऱ्या दर्शकाला जेव्हा क्रिकेटरने बॅटने दिला चोप, कसाबसा सुटला तावडीतून
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा
जार्वोच्या एन्ट्रीवर जाफरने ‘हे’ फनी मीम शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची उडवली खिल्ली