इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमला यांनी टी२० ब्लास्टमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. या दोन्ही धुरंधरांनी अर्धशतकी खेळी करत त्यांच्या सरे संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या हे दोन्ही खेळाडू यापूर्वी आयपीएलमध्ये खेळले आहेत.
गुरुवारी (१ ऑक्टोबर) लंडन येथे टी२० ब्लास्ट स्पर्धेचा दूसरा क्वार्टर फायनल सामना पार पडला. या सामन्यात सरे आणि केन्ट हे संघ आमनेसामने आले होते. दरम्यान सर्रे संघाच्या या फलंदाजांनी सलामीला फलंदाजीला येत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागिदारी रचली. यात रॉयच्या ५६ धावांचा समावेश होता. ४२ चेंडूत ८ चौकार ठोकत त्याने हा पराक्रम केला. तर अमलाने नाबाद राहत ५३ चेंडूत ७३ धावा कुटल्या. यात त्याच्या ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
रॉय आणि अमला यांच्या या अफलातून फलंदाजी प्रदर्शनामुळे सर्रे संघाने २० षटकात २ विकेट्स गमावत १६९ धावांचा स्कोर केला. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना केन्ट संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ ११३ धावाच करु शकला. त्यामुळे सर्रे संघाने ५६ धावांच्या फरकाने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
आता दूसऱ्या क्वार्टर फायनलप्रमाणे सरे हा संघ उपांत्य फेरीतही दमदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यात मजल मारेल का नाही, हे पाहणे रोमांचक ठरेल. त्यांचा उपांत्य फेरी सामना ३ ऑक्टोबर रोजी ग्लुसेस्टरशायर संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईतील मैदाने ठरतायत गोलंदाजांसाठी डोकेदुखी, पाहा आकडेवारी
हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच एमएस धोनीच्या नावावर होईल ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
चेन्नई-हैदराबाद सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार