---Advertisement---

RCBvsKKR । विजयकुमार वैशाकच्या घातक यॉर्करवर केकेआरचा सेट खेळाडू त्रिफळाचीत । पाहा VIDEO

On: बुधवार, एप्रिल 26, 2023 9:08 PM
Vijaykumar Vyshak
---Advertisement---

आयपीएल 2023चा पूर्वार्ध चाहत्यांसाठी चांगलाच रोमांचक राहिला. बुधवारी (26 एप्रिल) चालू आयपीएल हंगामाच्या उत्तरार्धाला सुरूवात झाली. हंगामातील 36व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. या सामन्यात केकेआरचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयल जबरदस्त प्रदर्शन करत ह होता. मात्र वियजकुमार वैशाक याच्या घातक यॉर्करवर त्याने विकेट गमावली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) करत होता. आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळणार असल्याने सलग तिसऱ्या सामन्यात विराटकडे संघाच्या नेतृत्वाची संधी आली. विराटने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि केकेआरला प्रथम फलंदाजी करावी लागली. जेसन रॉय आणि नारायन जगदीसन यांनी आपल्या केकेआरच्या डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केले.

नाराजन जगदीसन आणि जेसन रॉय यांच्यात पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदार झाली. जगदीसनच्या रूपात डावातील 10व्या षटकात केकेआरला पहिला झटका बसला. त्यानंतर याच षटकात विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vaishak) याने जेसन रॉयला देखील त्रिफळाचीत केले. जगदीसनने 29 चेंडूत 27 धावा करून विकेट गमावली. तर रॉयने 29 चेंडूत 56 धावा केल्या. वैशाखला या दोन विकेट्स 10व्या षटकातील दुसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर मिळाल्या. षटकातील शेवटचा चेंडे वैशाखने लेग स्टंपवर यॉर्कर टाकला, ज्याचा सामना खेळपट्टीवर सेट झालेल्या रॉयला देखील करता आला नाही. हा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात आमने सामने असणारे आरसीबी आणि केकेआर संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाच आणि आठव्या क्रमांकावर आहेत. आरसीबीने सुरुवातीच्या 7 पैकी चार सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 7 पैकी अवघ्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संघ आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हार्दिक पंड्या याचा गुजरात टायटन्स आहे. सीएसके आणि गुजरात यांनी प्रत्येकी 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. मात्र, नेट रन रेटच्या जोरावर सीएसके पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Jason Roy clean bowled a dangerous yorker from Vijaykumar Vaishak)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान-न्यूझीलंड मालिकेनंतर टी-20 क्रमवारीत महत्वाचे बदल, जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण?
चिन्नास्वामीवर ‘रॉय’राज! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकली वादळी फिफ्टी, एकाच षटकात 4 षटकारांची बरसात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---