---Advertisement---

विश्वचषक २०१९: जेसन रॉयने शतक तर केलेच पण अंपायरलाही पाडले खाली, पहा व्हिडिओ

---Advertisement---

कार्डीफ। 2019 आयसीसी विश्वचषकात आज(8 जून) सोफिया गार्डन मैदानावर 12 वा सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय शतक पूर्ण करत असताना त्याचा पंचाना धक्का लागून ते खाली पडल्याची एक मजेशीर घटना पहायला मिळाली आहे.

झाले असे की या सामन्यात 27 व्या षटकात जो रुट आणि जेसन रॉय फलंदाजी करत होते. तर मुस्तफिजूर रेहमान गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचवा चेंडू रेहमानने शॉर्ट लेन्थला टाकला. त्यावर 96 धावांवर खेळत असलेल्या रॉयने डीप स्केअर लेगला फटका मारला आणि तो 1 धाव घेण्यासाठी पळाला.

पण बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून चेंडू रोखण्यात चूक झाली. त्यामुळे चेंडू सीमापार गेला आणि रॉयने त्याचे वनडे क्रिकेटमधील 9 वे शतक 92 चेंडूत पूर्ण केले. मात्र याचवेळी रॉय धाव घेण्यासाठी धावत असताना त्याचे आणि मैदानावरील पंच जोएल विल्सन यांचे लक्ष चेंडूकडे होते. त्यामुळे ते एकमेकांना जोरात धडकले. रॉयच्या या धक्क्यामुळे विल्सन खाली पडले.

त्यानंतर रॉयने आणि बांगलादेशच्या खेळाडूंनीही विल्सन ठिक आहेत की नाही याची चौकशी केली. या घडनेनंतर विल्सन यांनाही हसू आले. तसेच रॉयचे हे शतक असे मजेदार पद्धतीने पूर्ण झाल्याचे पाहून ड्रेसिंगरुममध्ये असणाऱ्या त्याच्या संघसहकाऱ्यांनाही हसू आवरता आले नाही.

या सामन्यात रॉयला 121 चेंडूत 153 धावांवर असताना मेहदी हसनने बाद केले. या खेळीत रॉयने 14 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोबरोबर 128 धावांची सलामी भागीदारी रचली. त्यानंतर त्याने रुटबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचत इंग्लंडला भक्कम स्थितीत उभे केले.

तो बाद झाल्यानंतर जॉस बटलरने इंग्लंडच्या डावाची जबाबदारी घेत 44 चेंडूत 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना केलेल्या या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 386 धावा केल्या.

बांगलादेशकडून मेहदी हसन आणि मोहम्मद शैफुद्दीनने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान आणि मश्रफे मुर्तझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

https://twitter.com/gueswhoamiii/status/1137324046750609408

https://twitter.com/cricketworldcup/status/1137322883443826688

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: कर्णधार कोहलीला आशिर्वाद देण्यासाठी असा आहे त्याच्या शाळेचा अनोखा उपक्रम

विश्वचषक २०१९: ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूला आयसीसीने दिली ताकिद, जाणून घ्या कारण

विश्वचषक २०१९: डब्ल्यूडब्ल्यूईच्या या सुपरस्टारने दिल्या विराट कोहलीच्या टीम इंडियाला खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment