---Advertisement---

भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं ‘लज्जास्पद’!

On: रविवार, मार्च 21, 2021 2:45 PM
---Advertisement---

शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे झालेला पाचवा टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह भारताने ३-२ ने टी२० मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला. भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनाही त्यांची भूमिका योग्यरित्या पार पाडली. त्यातही अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याची विकेट काढली. त्यानंतर रागाच्या भरात जेसन लाजिरवाणे कृत्य करत टीकेचा धनी ठरला.

झाले असे की, भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला २२५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने जेसन रॉय आणि जोस बटलर यांना सलामीला पाठवले. इंग्लंड संघाला या सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. दुसरीकडे भारतीय संघाची पावरप्लेमध्ये अधिकाधिक विकेट्स घेण्याची रणनिती होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने ३१ वर्षीय भुवनेश्वरच्या हाती पहिले षटक सोपवले.

भुवनेश्वरने पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर जबरदस्त इनस्विंगर टाकला. यावर जेसनने बॅट फिरवत शॉट मारेपर्यंत चेंडू जाऊन यष्टीला लागला. हे पाहून जेसन भलताच चिढला. त्याने मैदानाबाहेर पडल्यानंतर डगआउटमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलींवर भडास काढली.

त्याचे बॅटने जोराने बाटलींना मारतानाचे लाजिरवाणाचे कृत्य कॅमेरात कैद झाले. त्यानंतर क्रिकेट रसिकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

https://twitter.com/pant_fc/status/1373301197281525768?s=20

https://twitter.com/Priyesh48349989/status/1373451236750413824?s=20

जेसन रॉयनंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर भुवीची दुसरी शिकार ठरला. १२ व्या षटकापर्यंत डेविड मलानसोबत मिळून बटलरने १३० धावांची भागिदारी केली होती. अशात १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर भुवीने हार्दिक पंड्याच्या हातून त्याला झेलबाद केले. या विकेटने सामन्याचा कायापालट केला आणि सामना भारतीय संघाच्या हातात आणला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने काही महत्त्वपुर्ण विकेट घेत इंग्लंडला १८८ धावांवर रोखले.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितचा ‘अनोखा’ षटकार पाहून कोहली झाला भलताच खुश, रिऍक्शन पाहून म्हणालं सुपर! 

रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग

Road Safety World Series: आज रंगणार इंडिया-श्रीलंका लीजेंड्स ‘महामुकाबला’, २०११ विश्वचषकाच्या आठवणी होणार ताज्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---