भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. टी२० विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी करत स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला होता. पण आता भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. या स्पर्धेनंतर प्रशिक्षकपदावरुन रवी शास्त्री पायउतार होणार आहेत.
भारतीय संघासोबतचा करार संपल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि आर श्रीधर यांना भावनिक निरोप दिला आहे. शास्त्रीबरोबरच भरत अरुण आणि आर श्रीधर हे देखील आपल्या पदावरुन बाजूला झाले आहेत.
बुमराहने सोशल मीडियावर शास्त्री आणि उर्वरित सपोर्ट स्टाफसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, ‘आधार, प्रेरणा आणि प्रोत्साहनाच्या शब्दांसाठी, पडद्यामागच्या मार्गदर्शनासाठी आणि मेहनतीसाठी, तुमच्या अमूल्य योगदानाबद्दल रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर यांचे आभार आणि तुमच्या भविष्यातील योजनांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.’
For the words of support, motivation and encouragement.
For the guidance and the tireless work behind the scenes.
For being a constant source of learning and counsel.
Thank you for your invaluable contribution and good luck for your future endeavours ???? pic.twitter.com/Ad4r0bVUkf— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) November 10, 2021
त्याच्या या ट्वीटवर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांनी लिहिले की, ‘धन्यवाद जसप्रीत. खरोखरच आनंदाची बाब आहे. तुम्हाला आणि संपूर्ण संघाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की आपण लवकरच यशाच्या मार्गावर परत येऊ.’
Thank you Boomshakalaka…it was for being such a wonderful student of the game and a even better human being. Stay Blessed ???????? ???? @Jaspritbumrah93 https://t.co/l2xID3M3ZF
— R SRIDHAR (@coach_rsridhar) November 10, 2021
भारतीय संघाला टी२० विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. पण बुमराहने चांगली गोलंदाजी केली. तो भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याने आणि रवींद्र जडेजाने ७-७ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेदरम्यान, बुमराह भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकले होते. आता बुमराहने ५५ सामन्यात ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलच्या नावावर ४९ सामन्यांत ६३ बळी आहेत.
सन २०१२ साली श्रीलंकेने आयोजित केलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताला आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. भारताने शेवटचा आयसीसी चषक २०१३ मध्ये जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवाग आणि धोनीने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने वाचली विराटची कारकीर्द? वाचा काय घडले होते
वेंकटेश अय्यरला विराटने काय दिला होता खास सल्ला? अष्टपैलूने केलाय खुलासा
जरा इकडे पाहा! पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंवर हाकालपट्टीची टांगती तलवार






