भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने खेळेल. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
वास्तविक, बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्यापासून केवळ 3 बळी दूर आहे. बुमराहनं 195 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 226 डावात 397 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी आतापर्यंत अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, कपिल देव, झहीर खान, रवींद्र जडेजा, जगवाल श्रीनाथ, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक बळी घेतले आहेत.
याशिवाय बुमराह 4 विकेट घेताच दिग्गज विनू माकंडला मागे टाकेल. बुमराह कसोटीत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळांडूंच्या लिस्टमध्ये 14व्या क्रमांकावर येईल. त्यानं आतापर्यंत 36 कसोटीत 159 बळी घेतले आहेत. तर विनू माकंड यांनी आपल्या कारकिर्दीत 44 कसोटीत 162 बळी घेतले.
कसोटीत जसप्रीत बुमराहच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड देखील आहे. विशेष म्हणजे, त्यानं हा रेकॉर्ड गोलंदाजीत नव्हे, तर फलंदाजीत केलाय! बुमराहनं 2022 मध्ये बर्मिंघम येथे इंग्लंडविरुद्ध एका षटकात 35 धावा ठोकल्या होत्या. कोणत्याही फलंदाजानं कसोटीतील एका षटकात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. बुमराहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या या षटकात 29 धावा केल्या. तर 6 धावा अतिरिक्त होत्या.
बांगलादेशिविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप , जसप्रीत बुमराह, यश दयाल
हेही वाचा –
मोठी बातमी! शुबमन गिल बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर; मोठे कारण समोर
बांग्लादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा किती वेळा पराभव केला? कसोटी मालिकेपूर्वी पाहा रेकॉर्ड
युवराज सिंगला त्याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणाला पाहायचं आहे? दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा