---Advertisement---

‘मिस्टर ऍंड मिसेस बुमराह’ इंग्लंडमध्ये करतायत धमाल मस्ती, क्यूट सेल्फीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

---Advertisement---

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. हा पराभव विसरून भारतीय संघातील खेळाडू सध्या मिळालेल्या वेळेचा पुरेपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. अंतिम सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरलेला जसप्रीत बुमराह देखील आपली पत्नी संजना गणेशनसोबत वेळ घालवत आहे.

इंग्लंड संघाविरुद्धच्या येत्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी, बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना बायो बबलमधून २० दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यामुळे संघातील खेळाडू मौज करताना दिसून येत आहेत. अशातच बुमराहनेही आपल्या पत्नीसोबत क्यूट सेल्फी शेअर केला आहे.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करत असतात. अशातच बुधवारी (३० जून) बुमराहने त्याची पत्नी संजनासह एक सेल्फी शेअर केला होता. या फोटोमध्ये तो इंग्लंडच्या एका पार्कमध्ये विश्रांती घेताना दिसून येत आहे. या फोटोवर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “तू नेहमी हसत रहा.”

बुमराहने शेअर केलेल्या या फोटोला अवघ्या काही तासातच लाखो लोकांनी लाईक केले आहे. तो काही दिवसांपूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मयंक अगरवालसोबत फिरताना दिसून आला होता. तसेच संघातील इतर खेळाडूही आपल्या कुटुंबासह मौज मस्ती करताना दिसून येत आहेत.(Jasprit bumrah and Sanjana Ganeshan light up instagram with their gorgeous photo)

https://www.instagram.com/p/CQvsuQuF84i/?utm_source=ig_web_copy_link

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील निराशाजनक कामगिरी विसरून बुमराह आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यातून सावरण्यात त्याची पत्नी त्याला मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी संजनाने जसप्रीत बुमराहला खुश करण्यासाठी गार्लीक ब्रेड आणि पास्ता बनवला होता. ज्याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून, “प्रेमाने बनवलेले जेवण” असे लिहिले होते.

महत्वाच्या बातम्या-

कुलदीप यादवसाठी श्रीलंका दौरा ठरेल शेवटची संधी, संघात स्थान मिळण्याबाबत दिली ‘ही’ प्रतिक्रिया

विश्वविजेत्या टी२० संघातील ‘हे’ २ भारतीय धुरंधर पुन्हा घडवणार इतिहास, गाजवणार २०२१चा वर्ल्डकप

पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून ‘या’ भारतीय खेळाडूला विश्रांती!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---