भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर १५ मार्च रोजी गोव्यामध्ये विवाह केला. या विवाहाबद्दल त्यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी सांगितली होती. अशातच आता या दोघांच्या विवाह सोहळ्यातील काही फोटोज् आणि व्हिडिओज देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
बुमराह आणि संजना यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मंडळींवर मोबाईल वापरण्यास निर्बंध लावण्यात आले होते. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे आपल्या संगीत सोहळ्यात नृत्य करताना दिसून येत आहे. बुमराहने काळया रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर दुसरीकडे संजनाने जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
https://www.instagram.com/p/CMcQQy4Ff1D/
या व्हिडिओ सोबतच त्यांच्या हळदी आणि मेहंदी सोहळ्यातील फोटोज् देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/CMdrIelrWn-/
https://www.instagram.com/p/CMe_-0ll0cF/
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जसप्रीत आणि संजना यांनी विवाह झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले होते की, “प्रेमाने प्रेरित होऊन,आम्ही सोबत मिळून नवीन प्रवास सुरू केला आहे. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे.”
https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/
कोण आहे संजना गणेशन?
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेट व्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांना देखील होस्ट करताना पाहायला मिळाली आहे. ती पहिल्यांदा स्प्लिट विला या टीव्ही शोमध्ये झळकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
केदार जाधवची नव्या प्रवासाला सुरुवात! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
सात वर्षांनंतर ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ एकत्र; मात्र पहिल्याच फेरीत बसला पराभवाचा धक्का
दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर