यंदाचे 2020 हे वर्ष प्रत्येक बाबतीत लोकांना आश्चर्यकारक ठरले आहे. त्याचबरोबर आता भारतीय संघातील क्रिकेटपटूंच्या मानधनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. या वर्षातील सर्वात जास्त मानधन जसप्रीत बुमराहने मिळवले आहे. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
सर्वाधिक सामना शुल्क मिळविण्याच्या यादीत भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा टॉप 5 मध्ये सुद्धा नाही. जसप्रीत बुमराहने भारतीय संघाकडून 2020 मध्ये 4 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून भारतीय खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये मानधन दिले जाते. त्याचबरोबर प्रत्येक वनडे सामना खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. त्यामुळे जसप्रीत बुमराहला 2020 या वर्षात 1.38 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. हे मानधन त्याच्या कराराव्यतिरिक्त दिले जाणारे आहे.
विराट कोहली 2020 मध्ये भारतीय संघाकडून 3 कसोटी, 9 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळला आहे. यामधून त्याने या वर्षात 1.29 कोटी रुपये मानधन प्राप्त केले आहे. तो जसप्रीत बुमराहनंतर भारतीय संघाचा सर्वात जास्त मानधन मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मजेदार गोष्ट म्हणजे विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी गेला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात सहभागी झाला नाही. जर त्याने हा सामना खेळला असता, तर त्याला या वर्षी एकूण 1.44 कोटी रुपये मानधन मिळाले असते.
जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीनंतर सर्वात जास्त मानधन घेणारा भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा आहे. तो यावर्षी 2 कसोटी, 9 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळला आहे. यामधून त्याने 96 लाख रुपये सामन्याचे मानधन मिळवले आहे.
मात्र, रोहित शर्मा हा भारताचा प्रमुख फलंदाज असूनही त्याला सर्वाधिक मानधन मिळवणार्या यादीत टॉप 5 मध्ये सुद्धा स्थान मिळाले नाही. रोहितने या वर्षी 3 वनडे आणि 4 कसोटी सामने खेळले आहेत. या मधून त्याने 30 लाख रुपये मिळवले आहेत.
रोहित शर्मा पेक्षा जास्त यंदा अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत या दोघांना मानधन मिळाले आहे. अजिंक्य रहाणेने 2020 मध्ये 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामधून त्याला 60 लाख मिळाले आहेत. त्याचबरोबर रिषभ पंतने यंदा 3 कसोटी, 1 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत यातून त्याला 57 लाख रुपये मानधन मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात जन्मलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरचे निधन; घेतल्यात हजाराहून अधिक विकेट्स
‘बॉक्सिंग डे’ कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने





