---Advertisement---

बुमराहने रचला इतिहास! ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा रेकाॅर्ड मोडला, मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा एकमेव गोलंदाज!

---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव करून विजयाची सुरुवात केली. मुंबईच्या विजयात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मोठी भूमिका बजावली. भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लखनऊविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला आणि एक मोठा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला. त्याने मुंबई इंडियन्सकडून बराच काळ खेळणारा आणि सध्या संघाचा मार्गदर्शक असलेल्या लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) एक मोठा रेकाॅर्ड मोडला.

जसप्रीत बुमराहने सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने एडन मार्करमच्या रूपात मुंबईला सामन्यातील पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या बुमराहने एका षटकात 3 विकेट्स घेतल्या आणि लखनऊला विजयापासून खूप दूर नेले. कर्णधार हार्दिक पांड्याने 16वे षटक बुमराहकडे सोपवले, ज्यामध्ये या घातक वेगवान गोलंदाजाने 3 विकेट्स घेतल्या. त्याने दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि नंतर शेवटच्या दोन चेंडूंवर अब्दुल समद आणि आवेश खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने फक्त 22 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यातील बुमराहची पहिले यश हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 171वी विकेट होती. या विकेटसह तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. त्याने दिग्गज लसिथ मलिंगाचा रेकार्ड मोडला, जो या लीगमध्ये 170 विकेटसह मुंबईसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. बुमराहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि तेव्हापासून तो या फ्रँचायझीचा भाग आहे. बुमराहने आयपीएलमध्ये एकूण 174 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह – 174
लसिथ मलिंगा – 170

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---