मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(28 डिसेंबर) तिसऱ्या दिवसाशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 292 धावांनी आघाडी घेतली आहे. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 33 धावांत 6 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने खास विक्रमही केला आहे. तो एकाच वर्षात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटीत एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे.
त्याने जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जोहान्सबर्ग कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात 54 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने इंग्लंड विरुद्ध नॉटिंघम कसोटीमध्ये दुसऱ्या डावात 85 धावांत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे बुमराहने याचवर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच त्याने त्याचे या वर्षातील सर्व कसोटी सामने भारताबाहेर खेळले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समावेश आहे.
भारताकडून पदार्पण केल्यानंतर पहिल्याच वर्षी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही बुमराहच्या नावावर झाला आहे. त्याने यावर्षात 45 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीच्या टीम इंडियाचे ते स्वप्न अखेर झाले पुर्ण
–कोहलीबरोबरचा हा किस्सा आहे वर्षातील सर्वात्तम, पहा व्हिडीओ
–राजकोट बाॅय जड्डू संधी मिळताच टीम इंडियाकडून चमकला