भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या जुन्या फॉर्मात परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघासाठी बुमराह महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने 15 विकेट्स घेतल्या. याच प्रदर्शनाचा फायदा बुमराहच्या कसोटी क्रमवारीवर झाला आहे. बुधवारी (7 फेब्रुवारी) ताच्या क्रमवारीत बुमराह क्रमांक एकचा कसोटी गोलंदाज बनला आहे.
जसप्रीत बुमराह याआधी वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. बुधवारी कसोटी क्रमवारीत देखील त्याने पहिला क्रमांक पटकावला आणि मोठा विक्रम नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील प्रदर्शनाचा फायदा बुमराहला ताच्या क्रमवारीत झाल्याचे दिसते. पहिल्या सामन्यात त्याने 6, तर दुसऱ्या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. याच प्रदर्शनाच्या जोरावर बुधवारी तो क्रमांक एकचा कसोटी गोलंदाज बनला.
त्याच्याकडे सध्या 881 गुण आहेत. दुसरीकडे पहिल्या क्रामांकावर असणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. अश्विन 841 गुणांसह कसोटी गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अशी कामगिरी करणारा बुमराह पहिलाच गोलंदाज
वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सध्या तो पहिल्या क्रमांकावर नाहीये. पण यापूर्वी या दोन्ही फॉरमॅटमध्ये बुमराह पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच बुधवारी तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने पहिला क्रमांक पटकावला. अशी कामगिरी करणारा बुमराह एकमेव गोलंदाज आहे. याआधी अशी कामगिरी एकाही गोलंदाजाला जमली नाही.
Jasprit Bumrah becomes the FIRST ever bowler to be ranked No.1 in all formats – Tests, ODIs and T20Is. pic.twitter.com/1e9IOcGAZY
— Kausthub Gudipati (@kaustats) February 7, 2024
याआधी ‘या’ तीन फलंदाजांच्या नावावर आहे विक्रम
फलंदाजांच्या क्रमावारीत अशी कामगिरी याआधी तिघांनी केली आहे. यातील दोन ऑस्ट्रेलियाचे, तर एक भारतीय आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहली कसोटी, वनडे आणि टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचून आला आहे. बुमहार तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये क्रमांक एकला स्पर्श करून येणारा विराटनंतर दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांनी तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता.
महत्वाच्या बातम्या –
रचिन-विलियम्सनच्या लाटेत बुडली दक्षिण आफ्रिकेची नाव! WTC गुणतालिकेत न्यूझीलंडची बाजी, भारत-ऑस्ट्रेलिया तोट्यात
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर