शनिवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 16 षटकांचाच करण्यात आला होता. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाताची टीम प्रथम फलंदाजीसाठी आली. मात्र मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केकेआरला सुरुवातीलाच झटके दिले.
नुवान तुषारानं फिल सॉल्टला पहिल्याच षटकात 6 धावांवर बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. समोर होता या हंगामात तुफान फार्मात असलेला सुनील नारायण. बुमराहनं नारायणला षटकाचा पहिलाच चेंडू इन स्विंग टाकला. नारायण हा चेंडू वाचू शकला नाही. त्याला वाटलं चेंडू आऊट स्विंग होईल, मात्र चेंडू इन स्विंग होऊन बेल्सवर आदळला. अशाप्रकारे सुनील नारायण या सामन्यात ‘गोल्डन डक’ झाला. नारायणचा सध्याचा फॉर्म पाहता तो ‘गोल्डन डक’ झाल्यामुळे सर्वजण बुमराहच्या चेंडूची प्रशंसा करत आहेत. बुमराहच्या या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
You miss, I hit 🎯⚡️
A rare golden duck in Kolkata for Sunil Narine! 😲
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #KKRvMI pic.twitter.com/0DQsKdXDhD
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2024
सुनील नारायणनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 461 धावा केल्या आहेत. तो या हंगामात केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या हंगामात नारायण ‘गोल्डन डक’चा बळी ठरण्याची ही पहिलीच वेळ असली तरी याआधीही तो पहिल्या चेंडूवर 7 वेळा बाद झाला आहे. मनोरंजक बाब म्हणजे, 2012 मध्ये जेव्हा नारायणनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं तेव्हा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तो ‘गोल्डन डक’चा बळी ठरला होता.
सुनील नारायणनं आयपीएलच्या या हंगामात 12 सामन्यांमध्ये 461 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 38.42 आणि स्ट्राईक रेट 182.94 एवढा राहिला. त्याच्या नावे 3 अर्धशतकं आणि 1 शतक आहे, जे त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध लगावलं होतं. तसेच नारायणनं आतापर्यंत या हंगामात 46 चौकार आणि 32 षटकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ईडन गार्डनवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; पावसामुळे 16-16 षटकांचा असेल सामना
रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी, आता ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व
टी20 विश्वचषकाचे सामने भारतात थेट कधी आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या