भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यादरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. यादरम्यान, मोठी माहिती समोर येत आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय निवडसमिती कसोटी सामन्यांसाठी डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या शोधात असल्याचे बोलले जातेय. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांची नजर अर्शदीप सिंग, यश दयाल आणि खलील अहमद या गोलंदाजांवर आहे.
जसप्रीत बुमराह भारताच्या कसोटी संघात कधी पुनरागमन करू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे मानले जातेय. परंतु, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 21 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल. त्याचबरोबर या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत.
त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. उभय संघांमधील पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळवली जाईल. यानंतर 24 ऑक्टोबरपासून दोन्ही संघ पुण्यात आमनेसामने येणार आहेत. या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. वास्तविक, जर आपण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेवर नजर टाकली तर, बांगलादेश आणि न्यूझीलंड मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करू इच्छितो. यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा पाच कसोटी सामन्यांचा कठीण दौरा करायचा आहे.
हेही वाचा-
सीएएसने अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट, फोटो पाहून तुमचेही हृदय तुटेल
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?