भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा सामना रविवारी (दि. 24 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बुमराहला कोणतीही दुखापत झाली नाहीये. खरं तर, तो कुटुंबाला भेटण्यासाठी गेला आहे. त्यामुळे तो इंदोरच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्येही दिसणार नाही. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मुकेश कुमार याला संघात सामील करण्यात आले आहे.
बीसीसीआयने दिली माहिती
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार नाही याच्याविषयी बीसीसीआयने (BCCI) माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “जसप्रीत बुमराह दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघासोबत इंदोरला गेला नाहीये. तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला आहे. त्याला एक छोटा ब्रेक देण्यात आला आहे. दसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार हा संघाशी जोडला गेला आहे.”
🚨 UPDATE 🚨: Mr Jasprit Bumrah did not travel with the team to Indore for the 2nd ODI against Australia.
He has gone to visit his family and given a short break by the team management. Fast bowler Mukesh Kumar has joined the team as Bumrah's replacement for the 2nd ODI.
Bumrah… pic.twitter.com/4shp3AlXZV
— BCCI (@BCCI) September 24, 2023
बुमराह मागील काही काळापासून दुखापतीमुळे मैदानातून दूर होता. त्याच्या संघात पुनरागमनापूर्वी मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो बाहेर पडला होता. सर्वजण आशा करत होते की, बुमराह विश्वचषकापूर्वी फिट होईल आणि असेच काहीसे झाले. त्याने आयर्लंडविरुद्ध पुनरागमन केले. तसेच, त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेतही भाग घेतला आणि शानदार गोलंदाजी केली. त्याने नवीन चेंडूने विरोधी संघाच्या फलंदाजांना चांगलाच त्रास देत जास्त धावा करू दिल्या नाहीत.
बुमराहच्या जागी कुणाला संधी?
जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. त्या सामन्यात मोहम्मद सिराज याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता दुसऱ्या वनडेत बुमराह खेळणार नाही. अशात त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. (Jasprit Bumrah did not travel with the team to Indore for the 2nd ODI against Australia know why)
महत्त्वाच्या बातम्या-
‘The Wall’ द्रविडच्या कुटुंबातून आनंदाची बातमी! लेक समितची ‘या’ संघात निवड, लगेच वाचा
‘जर मी गोलंदाज असतो, तर…’, Mankading विषयी ईश सोधीच्या विधानाची सर्वत्र चर्चा