भारत आणि दक्षिण आफ्रिक यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जिंकण्यासाठी भारतीय संघ बुधवारी (3 जानेवारी) मैदानात उतरला. पण याही सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. पण यजमानांच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या डावात आपला ‘फाईव्ह विकेट हॉल’ पूर्ण केला.
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने 98 धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिका 55, तर भारतीय संघ 153 धावा करून पहिल्या डावात सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाच्या शेवटच्या संघात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी संधी मिळाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान संघाची धावसंख्या 3 विकेट्सच्या नुकसानावर 62 धावा होती. या तीन पैकी एक विकेट जयप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने, तर दोन विकेट्स मुकेश कुमार (Mukesh Kumar) याने घेतल्या. पहिल्या दिवशी स्ट्रिस्टन स्टब्स याची विकेट घेणाऱ्या बुमराहाल दुसऱ्या दिवशी मोठे यश मिळाले.
गुरुवारी (4 जानेवारी) जसप्रीत बुमराह बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीतीत 9वा ‘फाईव्ह विकेट हॉल’ नावावर केला. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका डेव्हिड बेडिंगहॅम (11) याच्या रुपात बुमराहनेच दिला. त्यानंतर काईल वेरेन (9) यालाही बुमराहने मोहम्मद सिराजच्या हातात झेलबाद केले. दिवसातील तिसरी विकेट दक्षिण आफ्रिकेने मार्को यान्सेन (11) याच्या रुपात गमावली. यान्सेननेही बुमराहची शिकार बनला. त्यानंतर दिवसातील चौथी विकेट देखील बुमराहने केशव महाराज (3) याची घेतली. केशव महाराजने विकेट गमावल्यानंतर यजमान संघाची धावसंख्या 7 विकेट्सच्या नुकसानावर 111 धावा होती.
जसप्रीत बुमराह याच्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ही 9वी वेळ आहे, जेव्हा वेगवान गोलंदाजाला एका डावात 5 विकेट्स घेता आल्या. गुरुवारच्या प्रदर्शनानंतर बुमराह दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक ‘फाईव्ह विकेट हॉल’ घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी दिग्गज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांची बरोबरी केली. या दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन वेळा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विकेट्सचे पंचक नावावर केले होते. (Jasprit Bumrah equals Javagal Srinath after taking five-wicket haul in Cape Town)
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA: टीम इंडिया 153 धावांवर ऑलआऊट झाल्याने माजी दिग्गज खवळला, म्हणाला, ‘केएल राहुलमुळे…’
IND vs SA: केपटाऊन कसोटीबाबत दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘आम्ही या विकेटवर 100 धावाही…’