जसप्रीत बुमराहने जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केला होता. त्याकाळी जसप्रित बुमराहचे नाव खूपच गाजले होते. त्यावेळी जसप्रित बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. त्याच्या गोलंदजीच्या स्ट्राईल मुळे तसेच त्याच्या अभेद्य याॅर्करमुळे त्यावेळी तो खूपच चर्चेत होता. बुमराह आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात डेब्यू केला. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदात तो जास्त वेळ खेळला. आणि आता परत टीम इंडियामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहने विराट आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल खुलासा केला आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, ” रोहित शर्माकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तो अलिकडच्या काळात महान कर्णधार म्हणून उद्यास आला आहे. तो नेहमी सर्वांचे बोलणे ऐकून घेत असतो. गोलंदाजांबद्दल देखील आधी तो त्यांच्या गोष्टी करायला लावतो जर ते प्रभावशाली नाही झाल्यास मग तो गोलंदजांना सल्ला देतो. एक कर्णधार म्हणून तो सर्व खेळाडूंशी मित्राप्रमाणे वागतो. रोहित संघातील वातावरण नेहमी हसरे ठेवतो. मी खरचं खूप भाग्यवान आहे की, रोहितच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली.
विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत बोलताना म्हणाला, कोहली खूप वेगळा आहे. तो ऊर्जाने भरलेला आहे. तो मैदानात खेळताना स्वत: पूर्णपणे झोकून देतो. फिटनेसबाबत त्याने संपूर्ण संघाला खूप पुढे नेला आहे. विराट कोहली सध्या कर्णधार नसला तरी तो संघाचा लीडर आहे.
Jasprit Bumrah talking about Virat Kohli the leader. 🐐pic.twitter.com/QghutXbCzK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 26, 2024
अलिकडेच झालेल्या टी20 विश्वचषकानंतर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आले आहे. बुमराहने टीम इंडियाच्या विश्वविजेत्या बनण्याच्या यशामध्ये सिंहाचा वाटा दिला होता. स्पर्धेत बुमराहने टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी विकेट्स घेऊन संघासाठी अनेक डावांमध्ये पुनरागमन करण्यात म्हत्त्वाची भूमिका बजावली होती. स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा-
“काही गोष्टी नियंत्रणाबाहेर..”, जसप्रीत बुमराहने मुंबईत ‘रोहित-हार्दिकच्या’ कर्णधारपदाचा वादवार दिली प्रतिक्रिया
‘आम्ही चांगले लोक आहोत…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी पाकिस्तान क्रिकेटपटूचे अनोखे विधान
श्रीलंकेमालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा फटका, सरावादरम्यान स्टार खेळाडू दुखापत