---Advertisement---

बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 4:42 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं 24 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाला 13 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केलं.

2024 मध्ये बुमराहची कसोटी क्रिकेटमधील ही 50वी विकेट होती. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत त्यानं एंट्री केली आहे. बुमराहच्या आधी या यादीत फक्त कपिल देव आणि झहीर खान यांचीच नावं होती. कपिल देवनं हा पराक्रम दोनदा, तर झहीर खाननं हे एकदा केलं आहे.

कपिल देव यानं 1979 आणि 1983 मध्ये अनुक्रमे 74 आणि 75 कसोटी विकेट घेतल्या होत्या. तर झहीर खाननं 2002 मध्ये 51 कसोटी विकेट घेतल्या होत्या. बुमराहनं 2024 मध्ये आतापर्यंत 50 विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी टीम इंडियाला आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. तसेच ॲडलेड कसोटी सामन्यात आणखी दोन डाव बाकी आहेत. अशा परिस्थितीत बुमराहकडे आणखी बऱ्याच विकेट घेण्याची संधी आहे.

भारतीय गोलंदाजांनी एका वर्षात 17 वेळा 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. यामध्ये बुमराहची सरासरी सर्वोत्तम आहे. बुमराहनं यावर्षी 15.14 च्या सरासरीनं विकेट घेतल्या. बुमराहनं यावर्षीच्या 11व्या कसोटी सामन्यात 50वी कसोटी विकेट घेतली. त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी 6/45 आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कनं सहा विकेट घेतल्या. भारताकडून नितीश रेड्डीनं सर्वाधिक 42 धावा केल्या तर केएल राहुलनं 37 धावा केल्या. शुबमन गिलनं 31 धावा केल्या

हेही वाचा – 

नितीश रेड्डीला तोड नाही, चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर हाणला षटकार! VIDEO एकदा पाहाच
भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---