---Advertisement---

‘तुझा सार्थ अभिमान’; जसप्रीत बुमराहचा मायदेशात विकेट्सचा पहिला ‘पंचक’, पत्नीने केले रिऍक्ट

Sanjana-And-Bumrah
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. एकीकडे श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांचा समाचार घेतला. तर भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात विकेट्सचा पंचक घेत पाहुण्यांना १०९ धावांवर रोखले आहे. त्याच्या या कारनाम्यानंतर त्याची पत्नी (Jasprit Bumrah Wife) आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन (Sanjana Ganeshan) हिने प्रतिक्रिया (Sanjana Ganeshan Reacts) दिली आहे. 

भारताच्या २५३ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना बुमराहने श्रीलंकेच्या अर्ध्या संघाला माघारी धाडले. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे पंचक घेण्याची ही त्याची आठवी वेळ होती. तर घरच्या मैदानांवर पहिल्यांदाच त्याने हा पराक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमी कामगिरीनंतर त्याची पत्नी संजनाने सोशल मीडियावर शानदार पोस्ट केली आहे.

संजनाने ट्वीटरवर लिहिले आहे की, ‘आठवा आणि अजून मोजणी सुरू आहे… तुझा खूप अभिमान वाटतोय.’

संजना सध्या न्यूझीलंडमध्ये आहे, जिथे आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ सुरू आहे. या स्पर्धेमध्ये ती एँकरिंग करते आहे.

जसप्रीत बुमराहने असा घेतला विकेट्सचा पंचक
बुमराहने श्रीलंकेच्या पहिल्या डावादरम्यान १० षटके गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने या डावादरम्यान १० षटके गोलंदाजी करताना त्यातील ४ निर्धाव षटके टाकली आहेत. यादरम्यान केवळ २४ धावा देत त्याने श्रीलंकेच्या ५ फलंदाजांना बाद केले आहे. त्याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस, लहिरू थिरिमाने, एंजिलो मॅथ्यूस, निरोशन डिकवेला आणि लसिथ एंबुलडेनिया यांना पव्हेलियनला पाठवले आहे.

मराहने ५ विकेट्सपैकी ३ विकेट्स या सामन्याच्या पहिल्या दिवशी घेतल्या होत्या, तर उर्वरित २ विकेट्स घेत त्याने श्रीलंका संघाचा पहिला डाव स्वस्तात संपवण्यात मोलाचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेतही कसोटीच्या एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नाद करा पण आमचा कुठं! जसप्रीत बुमराहचा मायदेशात डंका; ५ विकेट्स घेत श्रीलंकन फलंदाज धाडलं तंबूत

आरसीबीच्या कर्णधारपदासाठी फाफ डू प्लेसिस का योग्य? फ्रँचायझीच्या डायरेक्टरनेच दिले स्पष्टीकरण

‘टोपी सांभाळू शकत नाहीये, संघ कसा सांभाळशील’, रोहित शर्माच्या डोक्यावरून २ वेळा घसरली टोपी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---