जसप्रीत बुमराहनं मेलबर्न कसोटीत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीनं धमाल उडवली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुसर्या डावात यजमानांना ऑलआऊट करण्यासाठी भारताला फक्त एका विकेटची आवश्यकता होती. बुमराहनं नॅथन लायनला क्लीन बोल्ड करून हे काम फत्ते केलं. लायनच्या विकेटसह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य मिळालं.
जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात 57 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानं पहिल्या डावातही 4 बळी घेतले होते. अशाप्रकारे बुमराह विदेशात सर्वात जास्त वेळा 5 विकेट हॉल घेणारा तिसरा आशियाई गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानची बरोबरी केली. विशेष म्हणजे, बुमराहची सरासरी या यादीतील वसीम अक्रम आणि मुथय्या मुलिथरन यांसारख्या दिग्गजांपेक्षा कमी आहे.
विदेशात सर्वाधिक 5 विकेट हॉल घेणारे आशियाई खेळाडू (सरासरी)
15 – मुथय्या मुरलीधरन (25.93)
14 – वसीम अक्रम (24.80)
11 – जसप्रीत बुमराह (21.09)
11 – इम्रान खान (26.11)
9 – कपिल देव (30.78)
जसप्रीत बुमराहचा सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) हा 9 वा फाईव्ह विकेट हॉल आहे. या बाबतीत त्यानं इम्रान खानला मागे टाकलं. येथे सुद्धा मुरलीधरन आणि वसीम अक्रम त्यांच्या पुढे आहेत.
सेना देशांमध्ये आशियाई गोलंदाजांचे सर्वाधिक 5 विकेट हॉल
11 – वसीम अक्रम
10 – मुथय्या मुरलीधरन
9 – जसप्रीत बुमराह
8 – इम्रान खान
7 – कपिल देव
जसप्रीत बुमराहनं या बॉर्डर-गावस्कर मालिकेत 30 विकेट पूर्ण केल्या आहेत. एका मालिकेत अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनला. कपिल देवनं 1979 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वप्रथम ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या मालिकेचा एक कसोटी सामना अद्याप बाकी आहे. एका बॉर्डर-गावस्कर मालिकेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर आहे, ज्यानं 2000-01 मध्ये 32 गडी बाद केले होते. बुमराह या मालिकेत हा रेकॉर्ड मोडू शकतो.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
32 – कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, 1979
30 – जसप्रीत बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2024
29 – कपिल देव विरुद्ध वेस्ट इंडीज, 1983
28 – कपिल देव विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1979
हेही वाचा –
“भाऊ, तु आता निवृत्ती घे”; रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुरुवात
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण
मेलबर्न कसोटीत नाथन लायन, स्काॅट बोलँड जोडीने रचला इतिहास! कसोटीत 63 वर्षांनंतर केली अशी कामगिरी