---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध विकेट्सचा पंचक घेणाऱ्या बुमराहला मोठा फायदा, कसोटी क्रमवारीत टॉप-५ मध्ये; पाहा स्थान

On: बुधवार, मार्च 16, 2022 6:23 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील कसोटी मालिका (Test Series) पार पडली आहे. भारताने २-० च्या फरकाने ही मालिका जिंकली आहे. या मालिकेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) मोठा फायदा झाला आहे. त्यातही श्रीलंकेविरुद्ध एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याची किमया साधणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), याने कसोटी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. 

जसप्रीत बुमराहची टॉप-५ मध्ये उडी
बंगळुरू येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटीत बुमराहने ८ विकेट्स घेतल्या होत्या. याच सामन्यात त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. ही त्याची मायदेशात कसोटीतील एका डावात विकेट्सचा पंचक घेण्याची पहिलीच वेळ होती. या विक्रमी कामगिरीचे फळ त्याला कसोटी क्रमवारीच्या रूपात मिळाले आहे. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत (ICC Bowlers Test Ranking) त्याने ६ स्थानांची उडी घेतली असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

बुमराहव्यतिरिक्त अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यालाही गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता १७ व्या स्थानावर पसरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनाही फायदा
भारतीय गोलंदाजांबरोबरच श्रीलंकेच्या लसिथ एंबुलडेनिया आणि प्रविण जयविक्रमा यांनाही ५ स्थानांचा फायदा झाला आहे. एंबुलडेनिया ३२ व्या आणि जयविक्रमा ४५ व्या स्थानावर पोहोचले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स सर्वाधिक गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. त्याच्यानंतर भारताचा फिरकीपटू आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

फलंदाजांमध्ये विराटचे नुकसान, तर रोहितचा फायदा
फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आता भारताकडून रोहितचे गुण सर्वाधिक झाले (Highest Test Rating From India) आहेत. सध्या त्याच्या खात्यात ७५४ गुण आहेत. तो सहाव्या स्थानावर कायम आहे. याउलट विराटला गुणांसह स्थानांमध्येही नुकसान झाले आहे. तो पाचव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. सध्या त्याच्या खात्यात ७४२ गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

इथेही भारताकडून रोहितचाच डंका! कसोटी क्रमवारीत ‘या’ स्थानावर विराजीत, विराट तर जवळपासही नाही

इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतरही भारतीय संघ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार, पाहा कसं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---