भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात शुक्रवारपासून (०१ जुलै) बर्मिंघम येथे पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अनुपलब्ध असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर नेतृत्त्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बुमराह आपल्याला मिळालेल्या या संधीला आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी यशप्राप्ती मानतो. त्याने पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) दोन हात करण्यापूर्वी बुमराहने (Captain Jasprit Bumrah) माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण काढली आहे, ज्याने नेतृत्त्वाचा कोणताही अनुभव नसतनाही इतके यश मिळवले आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक बनला.
बुमराह (Jasprit Bumrah Statement) म्हणाला की, “दबाव असताना यश मिळण्याची मजा काही वेगळीच असते. मी जबाबदाऱ्या स्विकारण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि मला आव्हाने स्विकारायला आवडतात. एका क्रिकेटपटूच्या रूपात तुम्ही नेहमी दबावाच्या परिस्थितीत स्वतचे आकलन करण्याचा प्रयत्न करता. मी बऱ्याच क्रिकेटपटूंशी बोललो आहे, जे वेळेनुसार स्वत:मध्ये प्रगती करत गेले. मला आठवण आहे की, मी जेव्हा धोनीसोबत बोललो होतो. तेव्हा त्याने मला सांगितले होते की, भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यापूर्वी तो साधारण खेळाडू होता. त्याचा नेतृत्त्वाचा कसलाही अनुभव नव्हता. पण आता त्याला सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते.”
“मी माझ्या संघाची मदत कशाप्रकारे करू शकतो, यावर जास्त फोकस करत आहे. ना की, यापूर्वी मी काय केले आहे किंवा क्रिकेटची परंपरा आणि नियम कसे बनले आहेत,” असेही पुढे बुमराह म्हणाला.
कसोटी क्रिकेटमध्ये २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहने पुढे म्हटले की, “भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे, नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे. त्यातही कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्त्व करणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला आनंद आहे की, मला ही संधी मिळाली. मला स्वतभर खूप विश्वास आहे. आमचे सर्वांचे लक्ष्य कसोटी सामन्यावर असून आम्ही त्यासाठी तयार आहोत. खेळाडूंच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. विराट कोहलीचे सल्लेही महत्त्वपूर्ण असतील.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून मॉर्गन सर्वोत्कृष्ट कर्णधार’, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले कारण
‘आता जॉस इंग्लंडला बनवणार क्रिकेट जगतातला बॉस!’ इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून नव्या कर्णधाराची घोषणा
‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका