भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एक कसोटी शिवाय तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता या गोष्टीची प्रतिक्षा संपली आहे. तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ निश्चित करण्यात आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत भाराताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
वास्तविक, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी पुनर्निर्धारित कसोटी १ जुलै ते ५ जुलै दरम्यान खेळवली जाईल. हा सामना संपल्यानंतर दोनच दिवसांनी पहिला टी२० सामना ७ जुलै रोजी होणार आहे. अशा स्थितीत खेळाडूंवरील कामाचा ताण आणि थकवा लक्षात घेता कोहली, पंत आणि बुमराह यांना पहिल्या टी२० मधून विश्रांती दिली जाणार आहे.
???? JUST IN: India have named their white-ball squads for the tour of England. #ENGvIND | Details ???? https://t.co/aDBSrSLjhn
— ICC (@ICC) June 30, 2022
पहिल्या T20 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षरो पटेल, रवी बी. , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक
3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षरा पटेल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात होणारी मालिका येत्या १ जुलै पासून सुरू होत आहे. ही मालिका गेल्या वर्षी नियोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे ही मालिका मधेच रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मालिकेतील उरलेला पाचवा कसोटी सामना १ जुलैपासून खेळवला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका
VIDEO। ‘लॉर्ड’पेक्षा ‘हे’ टोपणनाव शार्दूलला जास्त आवडतं, खुद्द शार्दूलनेच सांगितले कारण
SL vs AUS | दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्याआधीच स्टेडियममध्ये मोठा अपघात, पाहा व्हिडिओ