सध्या आयपाएलच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली. संघामधील खेळाडूंच्या परस्पर अदलाबदलीसाठी ट्रेड विंडो देखील सुरू करण्यात आलेली आयपीएलमधील संघानी रीटेन केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहिर केली. त्यानंतर मंगळवारी (दि.15 नोव्हेंबर) संघात रीटेन न झाल्याने मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्ड याने आयपीएलमधून निवृत्ती जाहिर केली. निवृत्तीची घोषणा करताना पोलार्ड म्हणाला की जर तो मुंबई इंडियन्स संघामध्ये नाही खेळू शकत तर मुंबई इंडियन्स विरूद्ध देखील खेेळू शकत नाही. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा संघातील साथीदार जसप्रित बुमराह याने भावनिक होऊन एक ट्वीट केले. मात्र, हे बुमराहच्या चांगलच अंगाशी आले.
कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या निवृत्तीनंतर जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याने एक भावनिक ट्वीट केले, ज्यात तो म्हणाला की,”तुमच्याशिवाय मैदानावर खेळण्याची सवय व्हायला वेळ लागेल पण नेट्समध्ये आपल्या मस्करीची मज्जा येईल. एका अविश्वसनीय कारकीर्दीसाठी खूप खूप आभार आणि नव्या सुरूवातीसाठी शुभेच्छा.”
It'll take some used to you not being on the field out there with us, but I'll still enjoy our banter in the nets. Congratulations on an incredible career Polly and all the best for your new innings 👏 @KieronPollard55 pic.twitter.com/7NgaatvJko
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) November 15, 2022
बुहराहचे हे ट्वीट चाहत्यांच्या बघण्यात आले आणि त्याच्या या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. हे ट्वीट पाहताच चाहत्यांनी या स्टार गोलंदाजाला प्रश्नांनी घेरायला सुरूवात केली. एका चाहत्याने विचारले की टी20 विश्वचषकात एक देखील ट्वीट नाही आणि आता आयपीएल सुरू होताच सक्रीय झाला. एकाने लिहिले की आता आपण आयपीेएलसाठी फिट झाले असाल बुमराहजी?
या निवृत्तीनंतर पोलार्डने म्हटले की मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षक पदाचा स्वीकार केला आहे आणि आता तो यूएईमध्ये होणाऱ्या टी20 लीगमध्ये एमआय इमीराइट संघासाठी खेळणे सुरू ठेवेल. वेस्ट इंडिजच्या या 35 वर्षीय खेळाडूला आणखी काही वर्ष खेळण्याची ईच्छा होती. मात्र, संघासोबतच्या चर्चेनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. पोलार्डने आतापर्यंत खेळलेल्या 189 आयपीएल सामन्यात 3412 धावा केल्या आहेत. त्याने 2010मध्ये या संघासाठी पदार्पण केले होते.(Jasprit Bumrah got trolled for his tweet )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दे घुमा के! अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत राजवर्धनने महाराष्ट्राला मिळवून दिला थरारक विजय
आयपीएल रिटेन्शन: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? किती खेळाडूंवर लागणार बोली? घ्या जाणून