भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. बुमराह संघातून बाहेर असण्याचे कराण म्हणजे टी-20 विश्वचषकापूर्वी त्याला झालेली दुखापत. असे असले तरी, चाहते आणि भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. बुमराह लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे असे संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी (25 नोव्हेंबर) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये बुमराहला झालेल्या दुखापतीच्या वारंवार बातम्या येत राहिल्या. याच कारणास्तव तो संघातून आत बाहेर होत राहिला. पण पुढच्या वेळी संघात येण्यापूर्वी तो पूर्णपणे फिट झालेला असेल, असेच दिसते. सध्या तो स्वतःची फिटनेस मिळवण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. व्हिडिओत बुमराह धावताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असे अजिबात वाटत नाही की, तो कुठल्या दुखापतीचा सामना करत असेल.
बुमराहने शेअर केलेल्या व्हिडिओत सुरुवातील तो सराव करताना दिसला. सुरुवातीला त्याने इनडोअर अकादमित त्याने सराव केला आणि नंतर मोकळ्या मैदानात धावातानाही दिसला. मैदानात धावताना तो पूर्ण लयीत दिसत आहे. बुमराह भारताचा सर्वात महत्वाचा गोलंदाज आणि खेळाडू देखील आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये संघाला या वेगवान गोलंदाजाची चांगलीच कमी जाणवली आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे गोलंदाजी आक्रमण कमजोर झाल्याचे दिसत आहे. पुढच्या वर्षी भारतात आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. बुमराह पूर्णपणे फिट झाला, तर संघाला या आगामी विश्वचषक स्पर्धेत चांगलाच फायदा होऊ शकतो.
https://www.instagram.com/reel/ClYSsMmAZTk/?utm_source=ig_web_copy_link
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य पेरीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेदरम्यान सराव सत्रात बुमराह दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर तो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर काम करण्यासाठी दाखल झाला. या संपूर्ण मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. तसेच काही दिवसांनंतर टी-20 विश्वचषक 2022 मधून तो माघार घेत असल्याचेही सांगितले गेले. (Jasprit Bumrah has been seen practicing for the first time since his injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण
रमीझ राजांनी टीम इंडियाला पुन्हा डिवचले! म्हणाले, “तुम्हाला वाईट वाटेल पण मी सांगतो…”