---Advertisement---

बुमराहने रचला इतिहास..! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज

On: मंगळवार, जानेवारी 28, 2025 7:03 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ‘आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर’ बनल्याबद्दल प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिकडेच, बुमराहची आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. बुमराह व्यतिरिक्त, इंग्लंडचे हॅरी ब्रूक, जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड यांना आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले होते, परंतु बुमराहने बाजी मारत हा पुरस्कार पटकावला.

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आधी, राहुल द्रविड (Rahul Dravid) व्यतिरिक्त, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी भारतासाठी प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार जिंकला आहे. विराट कोहलीने हा प्रतिष्ठित पुरस्कार 2 वेळा जिंकला. पण एखाद्या भारतीय वेगवान गोलंदाजाला सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

2024 मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दमदार गोलंदाजी केली होती. बुमराह सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने 13 कसोटी सामन्यांत 14.92च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या होत्या. अलिकडेच, त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) 32 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या मालिकेत बुमराह सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता.

2024 मध्ये जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी-
‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज
‘आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’ जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; भारताने जिंकला टाॅस; मोहम्मद शमीचे पुनरागमन! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
किंग कोहली 25 वर्षीय खेळाडूच्या हाताखाली खेळणार, या कारणामुळे संघाचं कर्णधारपद नाकारलं
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी एबी डिव्हिलियर्सचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---