सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मालिका मध्येच रद्द करण्याात आली होती. सा मालिकेत उरलेली पाचवी कसोटी सध्या सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने अवघ्या ९८ धावांत ५ गडी गमावले. त्यानंतर उपकर्णधार रिषभ पंत अन् अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांनी डाव सावरला. रिषभ पंतने शतकी खेळा केल्यानंतर या सामन्यात रविंद्र जडेजानेही शतक झळकावले. त्यानंतर बुमराहने मात्र ८४व्या षटकात स्टूअर्ट ब्रॉडला तब्बल ३५ धावा मारल्या.
#TeamIndia fans, did you enjoy that from @Jaspritbumrah93 😄😄
Live – https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/xfBZ18bdd5
— BCCI (@BCCI) July 2, 2022
भारताचा कर्णधार जस्प्रीत बुमराहने एकाच षटकात इंग्लंडचा गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडचा पार धुव्वा उडवला. एकाच षटकात ३५ धावा मारल्यानंतर स्टूअर्ट ब्रॉडच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम झाला आहे. एकाच गोलंदाजाला कसोटी आणि टी२० षटकांच्या प्रकारात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा स्टूअर्ट ब्रॉड याने टी२० मध्ये एका षटकात ३६ धावा दिल्या होत्या त्यावेळी फलंदाजीला युवराज सिंग होता. आणि कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहने एका षटकात ३५ धावा चोपल्या.
दरम्यान, भारताने पहिल्या डावात एकुण ४१६ धावा करत भारतीय संघ सर्वबाद झाला आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी हा सामना जिंकणे अतिषय आवश्यक आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडू जीव ओतून खेळताना दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सर जडेजा अभी जिंदा है! सीएसके मॅनेजमेंटला इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून दिलं उत्तर
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’
वनडे आणि टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बटलरकडे नेतृत्त्वपद, तर ‘हा’ घातक फिरकीपटू बाहेर