भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह खेळाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले आहे. सध्या विराट कोहली या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
🚨 BUMRAH LEAVES FOR SCANS. 🚨
– Fingers are crossed…!!! 🤞pic.twitter.com/HAdB2tudiX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
भारतीय संघासाठी जसप्रीत बुमरहाच्या दुखापतीने मोठा धक्का बसला आहे. कारण संपूर्ण मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अश्या परिस्थितीत जसप्रीत बुमराहचा मेडिकल रिपोर्ट काय येतो, तो सामन्यात पुन्हा खेळणार का नाही? हे पाहणे निर्णायक ठरेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला बाद करून भारताला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात सॅम कॉन्स्टन्स आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. त्यानंतर पहिलाच सामना खेळणारा प्रसिध्द कृष्णाने स्टीव्ह स्मिथ, ॲलेक्स कॅरी आणि ब्यू वेबस्टरला बाद केले. त्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. शिवाय नितीशकुमार रेड्डीने देखील दोन विकेट्स घेतल्या. त्याने पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला तंबूत पाठवले. या बातमीखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 9 विकेट गमावून 173 धावा आहे.
हेही वाचा-
‘तुला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला का?’, वैतागलेला रोहित म्हणाला….
आजची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, रोहित शर्मा क्रिकेटमधून…
रोहित ‘द ग्रेट लीडर’! ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हिटमॅनची मैदानात एन्ट्री, संघाचं मनोबल वाढवलं