भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकमात्र कसोटी सामना, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली. कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली असून जसप्रीत बुमराहसाठी एक मोठी संधी तयार होताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये शक्यतो खूप कमी वेळा वेगवान गोलंदाजांना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दिग्गज कपिल देव (kapil Dev) याला अपवाद ठरतात. कपिलने १९८७ मध्ये कर्णधाराच्या रूपात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल ३५ वर्ष झाले, पण एकाही वेगवान गोलंदाजाने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले नाहीये. इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात मात्र जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही परंपरा मोडू शकतो.
परंतु हे सर्व तेव्हाच शक्य होईल, जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यासाठी उपस्थित राहणार नाही. रोहित सध्या कोरोना संक्रमित आहे, पण जर तो या कसोटी सामन्यापूर्वी कोरोनातून सावरला नाही, तर बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देवनंतर बुमराह दुसरा वेगवान ठरेल, ज्या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे.
संघाचा नियमित कर्णधार रोहितला कोरोनाची लागण झाली असून उपकर्णधार केएल राहुलने दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दोघांच्या अनुपस्थिती बुमराह कशा प्रकारे संघाचे नेतृत्व करतो, हे पाहण्यासारखे आहे. चालू वर्षाच्या सुरुवातील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. या मालिकेत बुमराहला संघाचा उपकर्णधार बनवले गेले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हटलेला की, जर त्याला कर्णधारपद मिळाले असते, तर तो ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी देखील तयार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद