India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (2 जुलै) रोजी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघाचे पहिले प्रशिक्षण सत्र (27 जून) रोजी झाले, ज्यात जसप्रीत बुमराह मैदानावर उपस्थित असूनही त्याने सराव केला नाही. येथूनच बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही अशा अफवांना जोर मिळाला. आता एक नवीन अपडेट समोर आले आहे, जे बुमराह दुसऱ्या कसोटीत न खेळण्याच्या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध करू शकते. पण, बुमराह खेळणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही. (Team India practice session)
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाने (28 जून) रोजी पर्यायी सराव दिवस ठेवला होता. संघाचे सर्व सदस्य मैदानावर उपस्थित होते, परंतु काही खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या सराव सत्रात सहभागी झाले नाहीत. साई सुदर्शन लीड्समध्ये आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात कोणतीही छाप पाडू शकला नव्हता, परंतु दुसऱ्या कसोटीपूर्वी त्यालाही नेट्समध्ये कसून सराव करताना पाहिले गेले. (Bumrah participation 2nd Test)
सरावाच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीचा सराव केला नव्हता. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा सराव केला, तर सिराजने फलंदाजीचा सराव केला होता. मात्र आज, शनिवारी, बुमराहसोबतच कृष्णा आणि सिराजनेही जोरदार गोलंदाजीचा सराव केला. तसेच बुमराह आणि सिराजने फलंदाजीचाही सराव केला. (Mohammed Siraj And Jasprit Bumrah Batting practice)
JASPRIT BUMRAH WORKING HARD FOR 2nd TEST ???????? [Sahil Malhotra] pic.twitter.com/Yy2DOysuvA
— Johns. (@CricCrazyJohns) June 28, 2025
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळेल की नाही? यावर अद्याप स्पष्टता नाही. परंतु, दुसऱ्या कसोटीच्या आयोजनासाठी अजून 4 दिवस बाकी आहेत. यादरम्यान त्याचा सराव करणे, हे एक संकेत मानले जाऊ शकते की संघ व्यवस्थापन त्याला दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकते. (Edgbaston Test match)
लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात 5 भारतीय संघासाठी 5 शतकवीर ठरले होते. तरीही संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. (Ind vs Eng 1st Test Result)






