रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या हाती देण्यात आले आहे. बुमराहने आपली ही जबाबदारी योग्यरितीने सांभाळत छोटेखानी पण तडाखेबंद खेळी केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला चांगलाच चोप देत बुमराहने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकी खेळींनंतर कर्णधार जडेजाने भारतीय संघाचा धावफलक पुढे नेला. १६ चेंडू खेळताना त्याने नाबाद ३१ धावांची धुव्वादार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ४ चौकारही मारले. त्यातही स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एकाच षटकात त्याने आपल्या खेळीतील अर्ध्यापेक्षा जास्त धावा चोपल्या. ब्रॉडच्या डावातील ८४ व्या षटकात बुमराहने वैयक्तिक २९ धावा जोडल्या. ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने या धावा जोडल्या.
या नाबाद ३१ धावांच्या खेळीसह बुमराह कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तब्बल ४६ वर्षांनंतर अर्थात १९७६ नंतर भारताकडून कोणता कर्णधार अशी कामगिरी करू शकलेला नाही. यापूर्वी १९७६ मध्ये बिशन सिंग बेदी यांनी ख्राईस्टचर्च येथे कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना खेळताना दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत ३० धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
Ek over mein full राडा! ft. 𝐁𝐎𝐎𝐌😳#OneFamily #ENGvIND @Jaspritbumrah93 pic.twitter.com/2EEG25Gwe5
— Mumbai Indians (@mipaltan) July 2, 2022
दरम्यान भारतीय संघाने पहिल्या डावात ८४.५ षटके खेळताना ४१६ धावा केल्या आहेत. भारताकडून उपकर्णधार रिषभ पंतने १११ चेंडूत १४६ धावांची प्रशंसनीय खेळी केली. तसेच रविंद्र जडेजानेही १०४ धावा जोडल्या. १९४ चेंडू खेळताना १३ चौकारांच्या मदतीने त्याने ही शतकी खेळी केली. या खेळींच्या जोरावर भारतीय संघाने धावफलकावर ४०० पेक्षा जास्त धावा लावल्या. आता इंग्लंडला ४१७ धावांचे आव्हान मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
करियर सुरू झालं तेव्हाही बाजार अन् संपायला आलं तेव्हाही बाजार! ब्राॅडला फुल नडलेत इंडियावाले
पंत आणि जडेजाने काढला इंग्लंडचा घाम, एकाच डावात शतके ठोकत १५ वर्षांच्या कामगिरीची पुनरावृत्ती
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’