आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (18 ऑगस्ट) खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी झालेले नाही घेतला. तब्बल 11 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करत असलेल्या तसेच नेतृत्वाची जबाबदारी असलेल्या जसप्रीत बुमराह याने आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी मिळवत यशस्वी पुनरागमन केले.
Bumrah in his first over:
4, W, 0, 0, W, 0
Best in the business forever in India. pic.twitter.com/6vcp9TAhsO
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2023
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अखेरचा सामना खेळलेला गुमराह पाठीच्या दुखापतीमुळे तब्बल 11 महिने क्रिकेटपासून दूर होता. या दौऱ्यावर पुनरागमन करत असताना नेतृत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली. नाणेफेक जिंकत त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
A grand return by Jasprit Bumrah!
Boom Boom is back…!! pic.twitter.com/ZTwepgYgQm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 18, 2023
आपल्या पुनरागमनाच्या पहिल्या षटकात त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर आयर्लंडचा सलामीवीर ऍण्ड्रू बालबिर्नी याचा त्रिफळा उडवला. त्यानंतरही त्याने आपल्या घातक गोलंदाजीचा प्रभाव दाखवताना पाचव्या चेंडूवर लॉरकन टकर याला यष्टीरक्षक संजू सॅमसन याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
(Jasprit Bumrah Makes Great Comeback Against Ireland Took Two Wickets In First Over)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या संघनिवडीवर सर्वात मोठी अपडेट! लगेच वाचा
BREAKING: एशियन गेम्सआधीच भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी, होती पदकाची आशा