भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अंतिम चरणात आली असताना अचानक त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यानंतर त्याचे माघार घेण्याचे कारण लग्न असून तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसह लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले असून बुमराहची वधूराणी कोणी अभिनेत्री नसून ती एक स्पोर्ट अँकर असल्याची कुजबूज चालू आहे.
त्याचे झाले असे की, लग्नाच्या सबबामुळे सुट्टी घेतली खरी, पण बुमराह नक्की कोणासोबत सात फेरे घेणार? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घोंगावत आहे. बुमराहची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिनेही सुट्टी घेतल्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांना आपल्या सुट्ट्यांची माहिती दिली, ज्यात तिने गालाला रंग लावल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘हॅपी हॉलिडे टू मी’. तिच्या या कॅप्शनमुळे बुमराह आणि तिच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी बुमराहने तिच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने त्यांच्यात अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
https://www.instagram.com/p/CL3uW_0JSE5/?utm_source=ig_web_button_share_sheet
एकीकडे बुमराहची वधूराणी अनुपमा आहे, अशी चर्चा चालू असताना दुसरीकडे संजना गणेशन हिचेही नाव बुमराहशी जोडले जात आहे. संजना ही आयपीएलमध्ये क्रिकेट प्रेझेंटर आणि आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या फॅन शोमध्येही दिसून आली आहे. पुण्यातील सिंबॉयसीस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेली संजना बुमराहची जीवनसंगिनी होणार असल्याची कुजबूज चालू आहे.
https://www.instagram.com/p/CKLpBfwppiI/?utm_source=ig_web_button_share_sheet
असे असले तरीही, बुमराहने अद्याप याबाबतीत कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे की, बुमराह नक्की दाक्षिणात्य अभिनेत्री का महाराष्ट्रीय स्पोर्ट्स अँकर यांच्यापैकी कोणाच्या लग्नबेडीत अडकेल?.
महत्त्वाच्या बातम्या-
Covid-19 Vaccine: विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी टोचून घेतली कोरोनाची लस
INDvsENG : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना; जाणून घ्या सर्वकाही