अलीकडेच भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठा अहवाल समोर आला होता. ज्यात असे म्हटले होते की वैयक्तिक कारणांमुळे हिटमॅन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकू शकतो. रोहितने ही माहिती बीसीसीआयला दिली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की रोहित नाही तर टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल? यानंतर रिषभ पंत आणि शुबमन गिल यांसारख्या युवा खेळाडूंच्या नावाचीही क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा होती. मात्र आता बीसीसीआयने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधारपद कोणाकडे सोपवायचे याचे संकेत दिले आहेत.
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच बोर्डाने संघाच्या उपकर्णधारपदाचीही घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा संघात नसेल तर जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची जबाबदारी घेईल. असे थेट संकेत मिळत आहेत.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा दौरा अनेक अर्थाने खास असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जात असल्यापासून या दोघांमध्ये पहिल्यांदाच 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये 4-4 सामन्यांची मालिका असायची. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर सलग तिसऱ्यांदा पराभूत करण्याकडे भारताची नजर असेल. टीम इंडियाने यापूर्वी 2018 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तिरंगा फडकावला आहे. 2014 पासून कांगारूंना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
त्ततपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध 3 कसोटी सामन्यांनासाठी यजनपद भूषवणार आहे. ज्याची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होईल. मालिकेतील पहिला सामना बेंगळुरु येथे होणार आहे.
हेही वाचा-
बीसीसीआयने या खेळाडूकडे पुन्हा पाठ फिरवली, शानदार फाॅर्म असताना देखील न्यूझीलंड मालिकेसाठी दुर्लक्षित
हाँगकाँग सिक्सेस सपर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, माजी सलामीवीर कर्णधाराच्या भूमिकेत
बीसीसीआयमुळे आरसीबीला करोडोंचा फायदा! मेगा लिलावापूर्वी बंगळुरुसाठी आनंदाची बातमी