ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहनं अप्रतिम गोलंदाजी करत एक खास कामगिरी केली आहे. बुमराहनं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 11व्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या. यासह त्यानं ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे.
जसप्रीत बुमराहच्या आता ऑस्ट्रेलियात एकूण 37 विकेट झाल्या आहेत. वसीम अक्रमनं त्याच्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात एकूण 36 विकेट घेतल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे अक्रमनं 15 डावात ही कामगिरी केली होती. तर जसप्रीत बुमराहनंही तेवढ्याच डावात 37 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज कर्टली ॲम्ब्रोस आहे. त्यानं येथे 78 कसोटी विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारे विदेशी गोलंदाज पुढीलप्रमाणे –
कर्टली ॲम्ब्रोस – ऑस्ट्रेलियात कर्टली ॲम्ब्रोसनं एकूण 78 कसोटी विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तो येथे सर्वाधिक बळी घेणारा विदेशी गोलंदाज आहे. ॲम्ब्रोसनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली.
सिडनी बार्न्स – इंग्लंडच्या सिडनी बार्न्सनं ऑस्ट्रेलियात खेळताना एकूण 77 विकेट्स घेण्यात यश मिळवलं होतं. तो ऑस्ट्रेलियात 13 कसोटी सामने खेळला होता.
रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीनं ऑस्ट्रेलियात 77 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
कोर्टनी वॉल्श – वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्शनं ऑस्ट्रेलियात एकूण 72 कसोटी विकेट घेतल्या होत्या.
रॉबर्ट जॉर्ज डायलन विलिस – इंग्लंडच्या रॉबर्ट जॉर्ज डायलन विलिसनं ऑस्ट्रेलियात 24 कसोटी सामने खेळत 72 विकेट घेतल्या.
इयान बोथम – इंग्लंडच्या इयान बॉथमनं ऑस्ट्रेलियात 18 कसोटी सामने खेळले. तो 69 विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
जेम्स अँडरसन – इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं ऑस्ट्रेलियात 21 कसोटी सामने खेळले आणि एकूण 68 बळी घेतले.
मायकेल होल्डिंग – वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज मायकल होल्डिंगनं 14 कसोटीत एकूण 63 विकेट घेतल्या.
रॉबर्ट पील – इंग्लंडच्या रॉबर्ट पीलनं ऑस्ट्रेलियात 14 कसोटी सामने खेळले असून तो 63 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.
लॅन्सलॉट रिचर्ड गिब्स – वेस्ट इंडिजच्या लान्सलॉट रिचर्ड गिब्सनं ऑस्ट्रेलियात एकूण 59 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा –
यशस्वी जयस्वाल बनला कसोटी क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’, मॅक्युलमचा रेकॉर्ड उद्ध्वस्त!
पर्थ कसोटीत टीम इंडियाचा दबदबा, यशस्वी-राहुलच्या जोरावर भारताकडे 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी
“तू मुलगी का झालास?”, चाहत्याच्या प्रश्नाला आर्यन बांगरचं थेट उत्तर; म्हणाला…