काही दिवसांपुर्वी चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान भारतावर पाहुण्या इंग्लंडच्या हातून २२७ धावांच्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. यामुळे इंग्लंडने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर पुढील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
हा २७ वर्षीय खेळाडू मागील काही काळापासून सातत्याने क्रिकेट सामने खेळत आहे. अशात त्याला शारिरीक आणि मानसिकरित्या आराम मिळण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराच कोहली यांनी बुमराहला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजला संघात स्थान देण्यात आले आहे.
बुमराहप्रमाणे इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यालाही दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. अर्थात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजांविना दुसरा कसोटी सामना खेळत आहेत.
जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी पदार्पण केलेला बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाचा भाग होता. जवळपास अडीच महिने चाललेल्या या दौऱ्यात त्याने वनडे आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी एकूण ६ सामने खेळताना त्याने १५ विकेट्स घेतल्या होत्या. तत्पुर्वी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्येही तो मुंबई इंडियन्सचा नियमित सदस्य होता.
अशाप्रकारे मागील बऱ्याच वर्षांपासून बुमराहला क्रिकेटपासून आराम मिळालेला नाही. अशात पाच दिवस चालणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आल्याने त्याला विश्रांतीसाठी थोडाफार वेळ मिळेल. त्यानंतर पुढील अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो पुन्हा खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG 2nd Test Live: डावाच्या सुरुवातीला टीम इंडियाला मोठा धक्का, शुबमन शून्यावर पायचित
एक असा गुजराती, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं पंखात बळ; आज इंग्लंडविरुद्ध करतोय कसोटी पदार्पण
ब्रेकिंग: टीम इंडियाकडून ३८ वनडे खेळलेला क्रिकेटपटू करतोय कसोटी पदार्पण, दुसऱ्या कसोटीत मिळाली संधी